Keshav Upadhye | “महाविकास आघाडीच्या गृहमंत्र्यांना तुरुंगात जावं लागलं”; सुळेंनी फडणवीसांवर केलेल्या टीकेला केशव उपाध्येंचं प्रत्युत्तर

Keshav Upadhye | मुबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात एका आंदोनावेळी पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवरुन राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता. त्यावरुन आता भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सुप्रिया सुळे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.

“देवेंद्र फडणवीस यांना काल सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? जमत नसेल तर राजीनामा द्या. अहो सुप्रिया सुळे महाविकास आघाडीमध्ये गृहमंत्र्यांना तुरुंगात जावं लागलं. काय पद्धतीची खंडणी वसूली सुरू होती. याची उदाहरणं कालही खैरेंच्या मुलाच्या रुपाने पुढे आली.” असेही उपाध्ये म्हणाले आहेत.

“आधी महाविकास आघाडी सरकारमध्ये काय चालत होतं याचा विचार करा आणि मग या सरकारवर बोला. या सरकारमध्ये जनतेच्या सेवेसाठी देवेंद्रजी काम करत आहेत. सगळ्या चुकीच्या गोष्टी त्या मोडून काढत आहेत. पण पुन्हा पुन्हा सिद्ध होत आहे की महाविकास आघाडी हा वाझे ते खैरे हा खंडणीचा प्रवास”, असे म्हणत केशव उपाध्ये यांनी महाविकास आघाडीवर सडकून टीका केली आहे.

औरंगाबादचे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी खासदार आणि नेते चंद्रकांत खैरे यांचे पुत्र माजी नगरसेवक आणि युवासेनेचे पदाधिकारी ऋषिकेश खैरे हे एका ऑडिओ क्लिप प्रकरणावरून वादात सापडले आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात बदली करून देण्यासाठी एक व्यक्तीकडून त्यांनी दोन लाख रुपये घेतल्याचे या ऑडिओ क्लिपमधून उघड होत आहे. मात्र संबंधित व्यक्तीचे काम न झाल्याने तो व्यक्ती आता ऋषिकेश खैरेंकडे पैसे परत करण्याची मागणी करत आहे. या प्रकरणावरून आता भाजप शिंदे गटाने चंद्रकांत खैरे आणि महाविकास आघाडी सरकारवर टीका सुरू केली आहे. भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.

“वाझे ते खैरे हीच खरी महाविकास आघाडीची ओळख आहे. सचिन वाझेंपासून चंद्रकांत खैरेंच्या मुलापर्यंत ज्या पद्धतीने पैशांची लुटालुट या राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाली, त्यावरून महाविकास आघाडी सरकार म्हणजे एका अर्थाने वसुलीचं सरकार होतं, हे पुन्हा पुन्हा स्पष्ट होत आहे.” अशी टीका केशव उपाध्ये यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या 

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.