Nana Patole | वंचितच्या युतीबाबत महाविकास आघाडीत मतभेद?; नाना पटोलेंनी स्पष्टच सांगितलं 

Nana Patole | गोंदिया : नुकतेच प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या वंचित बहुजन आघाडीने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेसोबत युती केली आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी पत्रकार परिषद घेत युतीची घोषणा केली होती. त्यामुळे राज्यात पुन्हा शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आली आहे.

नाना पटोले (Nana Patole) यांनी यावर आपली प्रतिक्रिया देताना म्हटले की, “प्रकाश आंबेडकर यांची उद्धव ठाकरे यांच्याशी युती झाली असून आंबेडकर यांचा महाविकास आघाडीशी काहीही संबंध नाही. आंबेडकरांना महाविकास आघाडीत घेण्याचा प्रस्तावही आमच्याकडे आलेला नाही.”

त्याचबरोबर “आंबेडकर यांची महाविकास आघाडीतील एन्ट्री केवळ मनघडन कहाणी आहे. प्रकाश आंबेडकरांबद्दल आम्हाला काही बोलायचे नाही. आम्ही त्यांना प्रस्ताव दिलेला नाही”, असं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलंय. ते गोंदियात एका खासगी कार्यक्रमासाठी आले होते.

महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्यापूर्वी राज्यात फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार पहाटेला स्थापन झाले होते. यावरही नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली. पहाटेच्या सत्तेत आम्ही नव्हतो. जे लोक पहाटेच्या सत्तेत होते त्यांनाच विचारा. काळीमा लावण्याचा ज्यांनी प्रयत्न केला त्यांनाच हा प्रश्न विचारा, असे नाना पटोले म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.