Sanjay Raut | “ते पांढऱ्या कपड्यातले देवदूतच, मला तसं…”; डॉक्टरांबाबत केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावर राऊतांची सारवासारव

Sanjay Raut | मुंबई : शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या वक्तव्यावरुन राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. ‘कोरोना काळात डॉक्टर्स आणि नर्सेस पळून जात होते’ असे वक्तव्य संजय राऊतांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरुन विरोधकांनीही त्यांना चांगलंच धारेवर धरलं होतं. मात्र आता संजय राऊत यांनी या प्रकरणाचे स्पष्टीकरण दिले आहे.

“डॉक्टर पळून गेले नाही, तर डॉक्टरांची कमतरता होती, असं मला म्हणायचं होतं. कोरोना काळात देशभरात डॉक्टरांची कमतरता होती. अशा परिस्थितीत उद्धव ठाकरेंनी राज्यातील जनतेला वैद्यकीय सुविधा पुरवल्या. त्यामुळे डॉक्टरांचा अपमान करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही”, असे म्हणत संजय राऊत यांनी सारवासारव केल्याचे दिसून येते.

“माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो. पण त्यांच्या भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. कोरोना काळात डॉक्टकरांनी देवदुताप्रमाणे काम केलं, ते पांढल्या कपडल्यातले देवदूतच होते, हे आम्ही वारंवार म्हटलं आहे”, असेही संजय राऊत म्हणाले आहेत.

“कोरोना काळात डॉक्टर आणि नर्सेस पळून जात असताना त्यांची मनधरणी करुन त्यांच्याकडून काम करुन घेणे कठीण काम होते. मात्र, ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंनी काम केले, त्यावर भाजपने त्यांचे आभार मानले पाहीजेत”, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले होते.

संजय राऊतांच्या या वक्तव्यावर अनेक डॉक्टरांनी आक्षेप घेतला होता. तसेच संजय राऊत यांनी माफी मागावी अशी मागणीही डॉक्टरांनी केली होती.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.