Glowing Skin | चेहऱ्यावरील चमक वाढवण्यासाठी बडीशेपचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Glowing Skin | टीम महाराष्ट्र देशा: बडीशेप (Fennel) बहुतांश भारतीय स्वयंपाक घरामध्ये वापरली जाते. जेवणानंतर बडीशेपचे सेवन केले जाते. पण तुम्हाला माहित आहे का? त्वचेची काळजी (Skin Care) घेण्यासाठी देखील बडीशेपचा वापर केला जाऊ शकतो. चेहऱ्यावरील चमक आणि सौंदर्य वाढवण्यासाठी बडीशेप उपयुक्त ठरू शकते. बडीशेपमध्ये भरपूर प्रमाणात विटामिन सी आढळून येते, जे अँटीऑक्सिडंट म्हणून काम करते. चेहऱ्यावरील चमक टिकवून ठेवण्यासाठी बडीशेप मदत करते. चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही पुढील पद्धतीने बडीशेपचा वापर करू शकतात.

बडीशेपचे पाणी (Fennel water-Glowing Skin)

चेहऱ्यावरील चमक वाढवण्यासाठी बडीशेपचे पाणी उपयुक्त ठरू शकते. यासाठी तुम्हाला बडीशेप रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवावी लागेल. त्यानंतर तुम्हाला सकाळी त्या पाण्याने स्वच्छ चेहरा धुवावा लागेल. बडीशेपच्या पाण्याने चेहरा धुतल्यावर चेहऱ्यावरील डाग निघून जातात, त्याचबरोबर चेहऱ्यावरील चमक वाढते. चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी या पाण्याचे सेवन देखील करू शकतात. हे पाणी प्यायल्याने चेहऱ्यासोबत शरीरही निरोगी राहू शकते.

बडीशेप पावडर (Fennel powder-Glowing Skin)

चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही बडीशेप पावडरचा वापर करू शकतात. यासाठी तुम्हाला एक चमचा बडीशेप पावडरमध्ये प्रमाणानुसार गुलाब जल मिसळून घ्यावे लागेल. त्यानंतर तुम्हाला हे मिश्रण साधारण वीस मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. वीस मिनिटानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. आठवड्यातून दोन ते तीन वेळा या मिश्रणाचा वापर केल्याने त्वचेवरील चमक वाढू शकते.

बडीशेप आणि दही (Fennel and curd-Glowing Skin)

तुम्ही जर चेहऱ्यावरील चमक वाढवण्यासाठी उपाय शोधत असाल तर बडीशेप आणि दही तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो. यासाठी तुम्हाला एक चमचा बडीशेप पावडरमध्ये दोन चमचे दही मिसळून घ्यावे लागेल. त्यानंतर तुम्हाला हे मिश्रण साधारण अर्धा तास चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. अर्धा तासानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. या मिश्रणाचा नियमित वापर केल्याने निर्जीव त्वचा निघून जाण्यास मदत होते.

चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही वरील पद्धतीने बडीशेपचा वापर करू शकतात. त्याचबरोबर चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी तुम्ही खालील औषधी वनस्पतींचा वापर करू शकतात.

तुळस (Basil-Skin Care With Herbs)

तुळशीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळून येतात, जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. त्याचबरोबर तुळशीमध्ये आढळणारे गुणधर्म त्वचेवरील वृद्धत्वाची लक्षणे कमी करू शकतात. त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही तुळशीचे सेवन करू शकतात किंवा तुळशीच्या पानांची पेस्ट तयार करून त्वचेवर लावू शकतात. नियमित तुळशीचा वापर केल्याने त्वचेवरील सुरकुत्या आणि वृद्धत्वाची लक्षणे कमी होऊ शकतात.

दालचिनी (Cinnamon-Skin Care With Herbs)

दालचिनीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात. त्यामुळे दालचिनीचा वापर अनेक औषधीमध्ये केला जातो. दालचिनीमध्ये आढळणारे गुणधर्म त्वचेची काळजी घेण्यास मदत करतात. त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही दालचिनीचे सेवन करू शकतात. दालचिनीचे सेवन केल्याने त्वचेवरील सुरकुत्या आणि वृद्धत्वाची लक्षणे कमी होऊ शकतात.

आवळा (Amla-Skin Care With Herbs)

आवळा आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर मानला जातो. आवळ्याचे नियमित सेवन केल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या, डाग, वृद्धत्वाची लक्षणे इत्यादी समस्या दूर होऊ शकतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.