महायुतीचं सरकार टिकणार नाही? अजित पवार गटातील आमदाराच्या वक्तव्याने खळबळ

Ajit pawar camp mla sunil shelke not sure about mahayuti govt survive or not

Sunil Shelke । लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरून वाद चालू आहे. नाशिक, छत्रपती संभाजीनगर वादंग पेटलेलेच आहे. नाशिकची जागा शिवसेनेला मिळायला हवी, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आग्रही आहेत तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून छगन भुजबळ आणि भाजपचे शहरात तीन आमदार आणि ७० नगरसेवक असल्याने नाशिक हा बालेकिल्ला असल्याचा सांगत नाशिकच्या जागेवर भाजपकडून गिरीश महाजन यांनी दावा केला आहे.

दरम्यान अजित पवार गटातील आमदार सुनील शेळके यांनी मोठे विधान केले आहे. शेळके म्हणाले, या महिन्यानंतर काय होईल ते माहिती नाही. महायुती टिकावी अशी मी देवाकडे प्रार्थना करतो. एक महिन्यानंतर सगळी मंडळी कशी पटापटा पळतील त्याचा मी विचार करतोय.

ही माणसं मला सापडतच नव्हती. गेली चार-साडेचार वर्षे मला बघितलं की पळायची, मला बघितलं की इकडे-तिकडे बघायची. आज सगळे सापडले. त्यामुळे माझा उर भरून आलाय. त्यामुळे सगळ्यांना मिठ्या मारायला पाहिजेत. तसेच महायुतीकडून श्रीरंग बारणेंचा प्रचार योग्यरित्या चालू आहे का? असा प्रश्नदेखील त्यांनी उपस्थित केला आहे.

आमदार सुनील शेळके यांनी भाजपचे गणेश भेगडे यांना देखील इशारा दिला आहे. शेळके म्हणाले, गणेश भेगडे… तू गळ्यात पडायच्या आधी तुला कसं ढकलायचं याचा विचार आम्ही करतोय. तुम्हालाही माहिती नसेल तुमच्या खाली मी सुद्धा सुरूंग लावून बसलो आहे.

पुढे बोलतांना शेळके म्हणाले, कुठल्या मुहुर्तावर मी आमदार झालो हेच मला कळेना. मला मुहूर्त सांगितला होता, त्या मुहुर्तावर मी निवडणुकीचा अर्ज भरून आलो. त्यानंतर पाच वर्षांच्या आत असं सर्वकाही चित्र मी पाहिलं आहे, असे काही अनुभव मी घेतलेत की पुढच्या २५ वर्षांत जो कोणी आमदार असेल त्याला असं चित्र पाहायची वेळ येणार नाही.

शेळके यांच्या वक्तव्यानंतर महायुती टिकेल का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तसेच महायुती टिकावी म्हणून शेळके यांनी देवाकडे पार्थना केली आहे.

sunil shelke not sure about mahayuti govt survive or not

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.