Manoj Jarange | टीम महाराष्ट्र देशा: सामाजिक कार्यकर्ते मनोज जरांगे मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी धडपड करत आहे. मराठ्यांना आरक्षण मिळावं, यासाठी त्यांनी मराठवाड्यात उपोषणाला सुरुवात केली होती.
तब्बल नऊ दिवस त्यांनी आमरण उपोषण केलं. त्यानंतर राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने केलेल्या विनंतीवरून त्यांनी आपलं उपोषण मागे घेतलं.
त्याचबरोबर राज्य सरकारच्या शिष्टमंडळासोबत चर्चा केल्यानंतर मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ठोस निर्णय घेण्यासाठी काही दिवसांची मुदत दिली आहे.
Manoj Jarange commented on Maratha Reservation
काल (02 नोव्हेंबर) अंतरवाली सराटी येथे राज्य सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करण्यासाठी दाखल झालं होतं. यादरम्यान राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांना मराठा आरक्षणाबाबत काही कायदेशीर बाजू समजून सांगितल्या आहे.
याच पार्श्वभूमीवर मराठ्यांना टिकणारं आरक्षण (Maratha Reservation) देण्यासाठी राज्य सरकारने 2 जानेवारी पर्यंतची मुदत मागितली होती.
परंतु, मनोज जरांगे यांनी राज्य शासनाला या मुद्द्यावर निर्णय घेण्यासाठी 24 डिसेंबर पर्यंत वेळ दिला आहे. अशात मनोज जरांगे यांनी शासनाला 02 जानेवारीपर्यंत वेळ दिला असल्याच्या चर्चा सुरू होत्या.
या चर्चांना मनोज जरांगे यांनी पूर्णविराम दिला आहे. “राज्य सरकारला आरक्षण (Maratha Reservation) देण्यासाठी 2 जानेवारीपर्यंतची डेडलाईन दिली असल्याची माहिती प्रसार माध्यमांमध्ये झळकत होती.
मात्र, राज्य सरकारसाठी 24 डिसेंबर हीच डेडलाईन आहे. यामध्ये कसलीच अॅडजेस्टमेंट होणार नाही”, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण मागे घेतलं असलं तरी त्यांचं आंदोलन कायम सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“राज्य सरकारने जर आम्हाला 24 डिसेंबर पर्यंत आरक्षण दिलं नाही तर आम्ही मुंबईत चक्काजाम करू. त्यानंतर त्यांना घराचं दार देखील उघडता येणार नाही.
त्यांनी जर मराठा आरक्षणावर (Maratha Reservation) ठोस निर्णय घेतला नाही तर आम्ही त्यांच्या सामाजिक, औद्योगिक, आर्थिक, व्यावसायिक सगळ्या वाहिन्या बंद करू”, असं जरांगे यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- Maratha Reservation | मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तर मुंबईत चक्काजाम करू; मनोज जरांगेचा शिंदे-फडणवीसांना इशारा
- Manoj Jarange | मराठा आरक्षण मिळेपर्यंत कोणतीही नोकरीभरती करू नका – मनोज जरांगे
- Devendra Fadnavis | फडणवीस-जरांगे आमने-सामने; मनोज जरांगेंनी उपोषण सोडल्यावर देवेंद्र फडणवीस म्हणतात…
- Manoj Jarange | उपोषण मागे घेतल्यानंतर मनोज जरांगे रुग्णालयात दाखल; पाहा जरांगेंची हेल्थ अपडेट
- Maratha Reservation | नागरिकांना दिलासा; मनोज जरांगेंनी उपोषण मागे घेतल्यामुळे एसटी बसेस पुन्हा सुरू