Sanjay Raut | 31 डिसेंबरला मिंधे सरकार जाणार म्हणून त्यांनी जरांगेंना 2 जानेवारीपर्यंत मुदत मागितली; संजय राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut | मुंबई: गेल्या महिन्यापासून मराठा समाजाचं आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या नेतृत्वात मराठा समाज आरक्षणासाठी लढत आहे.

या पार्श्वभूमीवर जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला सुरुवात केली होती. त्यानंतर काल राज्य सरकारच्या शिष्टमंडळासोबत चर्चा केल्यानंतर मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण स्थगित केलं आहे.

त्याचबरोबर मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी राज्य शासनाच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे  यांना 2 जानेवारीपर्यंत मुदत मागितली. मात्र,  मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबर पर्यंतचा अल्टिमेट दिला आहे.

मराठा आरक्षणावर (Maratha Reservation) तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने मनोज जरांगे यांच्याकडे 2 जानेवारीपर्यंत मुदत मागितली होती. परंतु, मनोज जरांगे यांनी 2 जानेवारीपर्यंत वेळ देण्यास नकार दिला आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर निर्णय घेण्यासाठी जरांगे यांनी राज्य शासनाला 24 डिसेंबर पर्यंत वेळ दिला आहे. पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे.

Sanjay Raut commented on Maratha Reservation

प्रसार माध्यमांशी बातचीत करत असताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी 24 डिसेंबर पर्यंत मुदत दिली आहे.

तर सरकारने यासाठी 2 जानेवारीपर्यंत वेळ मागितला होता. 31 डिसेंबरला हे घटनाबाह्य आणि बेकायदेशीर सरकार जाणार आहे. 31 डिसेंबर पर्यंत या सरकारच्या भविष्याचा निर्णय होणार आहे.

त्यामुळे सरकारने 2 जानेवारीपर्यंत मुदत मागितली. परंतु, मनोज जरांगे यांनी अत्यंत हुशारीने राज्य सरकारला 24 डिसेंबर पर्यंत वेळ दिला आहे.

सरकारला आता कळून-चुकलं आहे की 31 डिसेंबर पर्यंत आपलं मरण होणार आहे. त्यामुळे ते मराठा आरक्षणाचा मुद्दा जानेवारीपर्यंत ढकलत होते.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.