अजित पवार गटाची कोट्यवधी रुपयांची दलाली; हे दलाल सरकार म्हणत रोहित पवारांचा आरोप

Rohit Pawar VS Ajit Pawar Group

Rohit Pawar VS Ajit Pawar Group | अजित पवार गटाने कोट्यवधी रुपयांची दलाल केली असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला आहे.  हे दलाल सरकार म्हणत रोहित पवारानी अजित पवार गटावर टीका केली आहे.

रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत शासकीय दस्तावेज सादर केले आणि राज्य सरकारने दूध खरेदीत ८० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे.

रोहित पवार म्हणाले, ‘एका अज्ञात व्यक्तीने 11 फाईल माझ्या ऑफिसमध्ये पाठवल्या. गैरव्यवहाराच्या या 11 फाईलींचा अभ्यास मी केला आहे. शाकीय आश्रम शाळेत दुधाचा पुरवठा करण्याच्या कामात घोटाळा होत आहे. गैरव्यवहाराच्या 2 फाईल आज मी खुल्या करत आहे. दूध कंत्राटासाठी 80 कोटींची दलाली देण्यात आली.

आंबेगावमधील एका खासगी कंपनीला कंत्राट देण्यात आलं आहे. कंत्राट महानंदाला दिलं असतं तर त्यांना मोठा फायदा झाला असाता. समाजकल्याण विभागात 25 टक्के दलालीचा घोटाळा आहे.’ असे गंभीर आरोप रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत केले.

LIVE PRESS Rohit Pawar

रोहित पवार म्हणाले, राज्यात एकूण ५५२ शासकीय आश्रमशाळा आहेत. या आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी त्यांना दररोज २०० मिली दूध दिलं जावं अशी अधिसूचना राज्य सरकारने काढली होती. या आश्रम शाळांमध्ये १.८७ लाख विद्यार्थी शिकत आहेत.

या विद्यार्थ्यांना दूध देता यावं यासाठी सरकारने दूध विक्रेत्या कंपन्यांबरोबर करार करण्यात आले आहेत. तशी कंत्राटं देण्यात आली आहेत. यासाठी २०१८-१९ मध्ये पहिला करार करण्यात आला. त्यानंतर २०२३-२४ मध्ये दुसरा करार करण्यात आला. राज्य सरकारने अमुल, महानंद, आरे आणि चितळे या कंपन्यांबरोबर करार केले आहेत.

२०१८-१९ च्या करारानुसार ४६.४९ रुपये प्रति लिटर दराने दूध खरेदी करून विद्यार्थ्यांना दिलं जात होतं. तर २०२३-२४ च्या करारानुसार अमुल कंपनीकडून ५०.७५ रुपये दराने दूध खरेदी करण्याचा करार झाला. २०२३-२४ मध्ये राज्य सरकारने १६४ कोटी रुपयांची नवीन निविदा काढली.

याअंतर्गत २०० मिलीलिटरचे ५.७१ कोटी टेट्रापॅक खरेदी करून ते मुलांना द्यायचं ठरलं. एका बाजूला दूध कंपन्या, दूध उत्पादक संघ शेतकऱ्यांकडून २४ ते ३१ रुपये प्रति लिटर या दराने दुधाची खरेदी करत आहेत. परंतु, राज्य सरकारने शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांसाठी २०२३-२४ मध्ये १४६ रुपये प्रती लिटर या दराने दूध खरेदी केलं आहे. पूर्वी हाच करार ५० रुपये प्रति लीटर असा होता. देशातले सर्वात श्रीमंत लोक, अंबानी-अदाणींसारखे लोकही एवढं महागडं दूध (१४६ रुपये प्रति लिटर) खरेदी करत नसावेत.

घाऊक बाजारात एक लिटरचा टेट्रापॅक ५५ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. २०० मिलीचा टेट्रापॅक १४ रुपयांना विकला जातो. त्यामुळे हा सर्व खर्च ८५ कोटी रुपयांपेक्षा कमी आहे. परंतु, सरकारने यासाठी १६५ कोटी रुपये खर्च केले आहेत. याचा अर्थ राज्य सरकारने यात ८० कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.