MS Dhoni ने दिला कर्णधारपदाचा राजीनामा, CSK ची सुत्रे मराठमोळ्या खेळाडूच्या हातात

MS Dhoni hands over CSK captaincy to Ruturaj Gaikwad

MS Dhoni | IPL 2024 चा १७ वा सीझन सुरु होण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्सला मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार MS Dhoni ने कर्णधारपदाचा राजिनामा दिला आहे. महेंद्रसिंग धोनीच्या राजीनाम्याने चाहत्यांना धक्का बसला आहे.

IPL 2022 च्या  स्पर्धेच्या अगोदरही धोनीने कर्णधारपदाचा राजिनामा दिला होता, तेव्हा संघाचे नेतृत्व अष्टपैलू रविंद्र जडेजाकडे देण्यात आले होते. परंतु संघाची खराब कामगिरी पाहता कर्णधारपद पुन्हा धोनीकडे देण्यात आले, त्यानंतर धोनीच्या नेतृत्वाखाली संघाने पुनरागमन केले आणि IPL 2023 ची आयपीएल ट्राॅफी मिळवली.

IPL ने सर्व कर्णधार आणि ट्रॉफीसह एक फोटो आपल्या सोशल मिडीया आकाऊंटवर शेअर केला आहे. टाटा IPL सुरू होत आहे. आम्ही रॉक अँड रोलसाठी सज्ज झालो आहोत. सादर करत आहोत ९ कर्णधार  आणि पंजाब किंग्जचा उपकर्णधार जितेश शर्मा संघाच्या फोटोसाठी प्रतिनिधित्व करत आहे, असे या फोटोला कॅप्शन देण्यात आलं आहे.

Ruturaj Gaikwad Replaces MS Dhoni As CSK Captain Ahead Of IPL 2024

या फोटो मध्ये CSK चा कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या ऐवजी फोटोसेशनला ऋतुराज गायकवाडने का हजेरी लावलीये असा प्रश्न चाहत्यांना पडला होता, परंतु काहीच वेळात CSK च्या संघ व्यवस्थापणाने भारतीय संघाचा सलामीवीर मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडची चेन्नई सुपर किंग्सच्या कर्णधारपदी निवड केली आहे असे जाहीर केले.

ऋतुराज गायकवाड २०१९ पासून संघाचा भाग आहे आणि त्याने ५२ सामने खेळले आहेत. २०२१ मध्ये तो ऑरेंज कॅप विजेता ठरला होता. त्याने आयपीएलच्या ५२ सामन्यांत १७९७ धावा केल्या आहेत.

सीएसकेने आत्तापर्यंत ५ वेळा आयपीएल ट्राॅफी मिळवली आहे. मुंबई इंडियन्स नंतर सीएसके हा IPL मधील सर्वात यशस्वी संघ आहे. CSK चा पहिला सामना उद्या (२२ मार्च) RCB सोबत चेन्नईच्या एम. ए चिदंबरम स्टेडियमवर खेळणार आहे, त्याआधी ही मोठी घोषणा सीएसकेच्या अधिकृत सोशल मिडीया आकाऊंटवरुन करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.