Rohit Pawar | मॅक्सवेलची एका पायावरची खेळी पाहून रोहित पवारांना आठवली शरद पवारांची जिद्द; म्हणाले…

बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

Rohit Pawar | टीम महाराष्ट्र देशा: आयसीसी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये काल (7 नोव्हेंबर) ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये सामना पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने तीन गडी राखून अफगाणिस्तानचा पराभव केला आहे. या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलिया ग्लेन मॅक्सवेल उत्कृष्ट खेळी खेळत आपल्या संघाला विजयापर्यंत घेऊन गेला.

या सामन्यांमध्ये त्याने द्विशतक ठोकलं आहे. ही खेळी खेळत असताना त्याच्या पायाला दुखापत झाली होती. तरी देखील न थांबता त्यानं आपलं द्विशतक पूर्ण केलं. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी ग्लेन मॅक्सवेल याचं कौतुक केलं आहे. मॅक्सवेलचं कौतुक करत असताना रोहित पवारांना शरद पवारांची आठवण झाली.

अफगाणिस्तान विरुद्ध सामना खेळत असताना ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलच्या पायाला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला नीट पळता येत नव्हतं. मात्र तरीही तो खेळत राहिला आणि आपल्या संघाला विजयापर्यंत पोहोचवले. त्यानंतर सर्वत्र त्याचं कौतुक होत आहे.

अशात आमदार रोहित पवार यांनी त्याचं कौतुक करत असताना शरद पवारांच्या एका प्रसंगाची आठवण करून दिली आहे. ट्विट करत रोहित पवार म्हणाले, “परिस्थिती कितीही विरोधात असली. मैदानात ‘योद्धा’ जखमी झाला तरी वेदनांना गाडून त्यावर हास्याचा लेप लावत त्वेषानं लढावंच लागतं. नुसतं लढावंच लागत असं नाही तर शानदार पद्धतीने विजयही खेचून आणावा लागतो.

अशा वेळी परिस्थितीही नक्कीच साथ देते. मग ते मैदान क्रिकेटचं असो की राजकीय! हेच काल ग्लेन मॅक्सवेलनं दाखवून दिलं.” या ट्वीटमध्ये रोहित पवारांनी शरद पवार आणि ग्लेन मॅक्सवेल दोघांचा फोटो पोस्ट केला आहे.

महत्वाच्या बातम्या –

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe