Eknath Shinde | शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरणार? विधानसभा अध्यक्ष बजावणार नोटीस

Eknath Shinde | मुंबई: शरद पवार (Sharad Pawar) गट आणि अजित पवार (Ajit Pawar) गट यांच्यात वादविवाद सुरू असताना शिंदे गटाच्या 16 आमदारांबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे. शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र ठरणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहे.

Rahul Narvekar will issue notice to Shivsena MLAs

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) ठाकरे गट आणि शिंदे गटातील आमदारांना नोटीस बजावणार असल्याची माहिती मिळाली आहे. विधानसभा अध्यक्ष शिंदे गटाच्या (Eknath Shinde) 40 तर ठाकरे गटाच्या 14 आमदारांना नोटीस पाठवणार आहे. आमदारांची बाजू ऐकून घेण्यासाठी विधानसभा अध्यक्षांनी त्यांना ही नोटीस पाठवणार असल्याचं बोललं जात आहे.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना शिवसेनेचं चिन्ह आणि नाव देण्यात आलं होतं. मात्र, शिंदे गट आणि ठाकरे गट दोन्हीही गट विधानसभा अध्यक्षांसमोर आपली बाजू मांडणार आहेत. या प्रकरणावर राहुल नार्वेकर काय निर्णय देतील? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, बंडाच्या एक वर्षानंतर ही ठाकरे गटातील नेते शिंदे गटात (Eknath Shinde) सहभागी होत आहे. यामुळे ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील वाद वाढत चालला आहे. ठाकरे गटाच्या नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) काल शिंदे गटात सामील झाल्या आहे. तर त्याआधी मनीषा कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.