Monsoon Session | सासुमुळे वाटणी झाली आणि सासूच वाट्याला आली; विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांची घोषणाबाजी

Monsoon Session | मुंबई: आजपासून विधिमंडळच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी नव्या मंत्र्यांची ओळख करून दिली. त्याचबरोबर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक झाल्याचं दिसून आलं आहे. काँग्रेस आणि ठाकरे गटनं विधिमंडळाच्या पायऱ्यावर उभं राहून सरकारचा निषेध करत आंदोलन केलं आहे.

Damn the unconstitutional and tainted government

‘घटनाबाह्य आणि कलंकित सरकारचा धिक्कार असो’, अशा आशयाचे पोस्टर घेऊन विरोधकांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर जोरदार आंदोलन केला आहे. या आंदोलनावेळी त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

‘सासूमुळे वाटणी झाली आणि सासूच वाटायला आली’, ’50 खोके एकदम ओके’ अशा घोषणा विरोधकांनी महाविकास आघाडीतील आमदारांनी यावेळी दिल्या. त्याचबरोबर हे घटनाबाह्य सरकार आहे असा दावा विरोधकांनी केला आहे.

दरम्यान, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ठाकरे गटानं मोठा निर्णय घेतला आहे. नीलम गोऱ्हे, मनीषा कायंदे आणि गोपीकिशन बजोरीया यांना अपात्र करा, अशी मागणी ठाकरे विधिमंडळ सचिवांना पत्राद्वारे केली आहे.

ठाकरे गटाच्या या मागणीनंतर तिन्ही आमदारांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. या आमदारांच्या अपात्रतेवर काय निर्णय घेतला जातो? याकडं आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

या तिन्ही नेत्यांनी पक्ष सोडल्यानंतर ठाकरे गटांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केली नव्हती. मात्र, पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी या तिन्ही आमदारांना ठाकरे गटांनी मोठा झटका दिला आहे.

या आमदारांचं पक्षांतर कायद्याच्या चौकटीत बसत नाही, त्यामुळे त्यांना अपात्र घोषित करा अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.