Mukta Tilak | मुक्ता टिळक यांच्या मुलाला धमकीचा फोन; राजकारणात मोठी खळबळ

Mukta Tilak BJP |  पुणे : पुण्याच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे सुपुत्र यांना धमकीचा फोन आल्याने राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. सध्या कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या (Kasba Peth By-election) या निवडणुकीत उमेदवारी नेमकी कुणाला द्यायची याबाबत सर्वच पक्षात संभ्रम आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष जोमाने तयारी करत आहेत. त्यातच आता दिवंगत आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांचे चिरंजीव कुणाल टिळक (Kunal Tilak) यांना एक निनामी फोन आल्याने राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी आपल्या तिकीट देण्याचं निश्चित झालं आहे. त्या मोबदल्यात पैसे पाठवा, अशी मागणी या फोनवरुन करण्यात आली आहे. संबंधित प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. कुणाल टिळक यांनी स्वत: याबाबत माहिती दिली आहे. कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक ( Mukta Tilak )  यांचे चिरंजीव कुणाल टिळक यांचे नाव देखील चर्चेत आहे.

“तिकीट निश्चित झाल्यामुळे तुम्ही यु पी आय ने या नंबरवर 76 हजार रुपये पाठवा” असे देखील सांगितले. मात्र कुणाल टिळक यांनी त्या व्यक्तीला कुठलीच दाद दिली नाही आणि हा सगळा प्रकार त्यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि पक्षाला कळवला आहे. कुणाल टिळक यांना कोणी फोन केला हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.