Imtiaz Jaleel | सध्याचं राजकारण बघता मी पण मुख्यमंत्री होऊ शकतो – इम्तियाज जलील

Imtiaz Jaleel | छत्रपती संभाजीनगर: अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या बंडानंतर राज्यातील राजकीय घडामोडींनी वेग धरला आहे. या घटनेवरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहे. याच पार्श्वभूमीवर इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सध्याचा राजकारण बघता मी देखील मुख्यमंत्री होऊ शकतो, असं जलील यांनी म्हटलं आहे.

Till yesterday these people called us Team B of BJP – Imtiaz Jaleel 

इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) म्हणाले, “कालपर्यंत ही लोकं आम्हाला भाजपची टीम बी म्हणत होते. आता हीच लोकं भाजपच्या मांडीवर जाऊन बसली आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता काहीच अशक्य नाही. इथे कोणीही कोणत्याही पक्षात कधीही जाऊ शकतो. सर्वांनी विचारधारा, धोरण, तत्त्व सगळं सोडून दिला आहे.”

पुढे बोलताना ते (Imtiaz Jaleel) म्हणाले, “सध्याची राजकीय स्थिती बघता उद्या मी मुख्यमंत्री झालो तर त्यात आश्चर्य वाटायला नको. नीलम गोऱ्हे आज शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्या आहे. सध्याच्या राजकारणानं अत्यंत गलिच्छ पातळी गाठली आहे की इथे काहीही अशक्य नाही.”

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार एकमेकांवर टीका करताना दिसले आहे. तुमचं वय आता 83 झाला आहे तुम्ही थांबणार आहेत की नाही? असं शरद पवारांना अजित पवार म्हणाले होते. न तो टायर्ड हूं ना तो रिटायर्ड हुं, अशा शब्दात शरद पवारांनी अजित पवारांच्या टीकेला उत्तर दिलं.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.