IPL 2024 । मुंबई इंडियन्सच्या फॅन्ससाठी महत्वाची अपडेट

Hardik Pandya All Set To Lead Mumbai Indians In Indian Premier League 2024

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

IPL 2024 मुंबई । इंडियन प्रीमियर लीग ( Indian Premier League )  2024 ची तयारी सुरू झाली आहे. आयपीएलच्या येत्या हंगामासाठी सर्व संघ सुसज्ज होत आहे.

त्याचबरोबर आयपीएल 2024 मध्ये आपल्याला अनेक संघात बदल झालेले दिसणार आहे. सर्वात मोठा बदल गुजरात टायटन्स ( Gujarat Titans )  आणि मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians ) मध्ये झालेला दिसून येणार आहे.

आयसीसी वर्ल्डकपदरम्यान हार्दिकच्या (Hardik Pandya) टाचेला दुखापत झाली होती, तेव्हापासून तो मैदानाबाहेर होता. अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिका पांड्या खेळाला नव्हता. तसेच तो आयपीएल खेळणार नसल्याच्या  चर्चा रंगल्या होत्या.

Hardik Pandya All Set To Lead Mumbai Indians In Indian Premier League 2024

यामुळे मुंबई इंडियन्सचे नेतृत्व पुन्हा एकदा रोहित शर्माकडे ( Rohit Sharma ) येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने IPL 2024 पूर्वी पुन्हा गोलंदाजीचा सराव करण्यास सुरवात केली आहे. हार्दिक सध्या दुखापतीतून सावरत असून आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे.

Rohit Sharma will play under Hardik Pandya in IPL 2024

हार्दिक दुखापतीतून पूर्णपणे सावरला असून तो दररोज सराव करत आहे. पांड्याने इंस्टाग्रामवर नेट सत्रादरम्यान गोलंदाजीचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामुळे हार्दिक खेळणार की नाही मुंबईचे नेतृत्व कोण करणार? या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. IPL 2024 मध्ये पंड्या मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करण्याची ही पहिलीच वेळ असेल.

रोहित शर्मा ( Rohit Sharma ) हार्दिकच्या नेतृत्वात IPL 2024 खेळणार आहे. त्यानंतर होणाऱ्या T20 World Cup 2024 ला रोहित भारताचे नेतृत्व करेल.

महत्वाच्या बातम्या