IPL 2024 : ऋतुराज गायकवाडची शतकी खेळी व्यर्थ; लखनौचा 6 विकेट्सने विजय

IPL 2024 LSG vs CSK : लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) आणि चेन्नई सुपर किंग्समध्ये (Chennai Super Kings) आजचा सामना चेन्नई च्या घरच्या मैदानात झाला.

LSG vs CSK सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. स्टोइनिसच्या दमदार शतकी खेळीच्या जोरावर लखनौने हा सामना जिंकला आहे.

नाणेफेक जिंकून लखनौने गोलंदाजीचा निर्णय घेतला. चेन्नईने पहिल्यांदा फलंदाजी करताना 210 धावांचं आव्हान लखनौ संघापुढे ठेवलं. चेन्नईने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनौकडून स्टोइनिसने शतकी खेळी केली. स्टोइनिसने  63 चेंडूत 124 धावांची नाबाद खेळी केली. यामध्ये 13 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश आहे.

ऋतुराज गायकवाडने 60 चेंडूत 108 धावा करत शतक झळकावलं. यामध्ये त्याने 12 चौकार आणि तीन षटकार लगावले. पराभव पचवणं खरंच खूप कठीण आहे. पण एक चांगला खेळ झाला. लखनौने खरंच चांगली कामगिरी केल्याचे गायकवाडने सांगितले.

“हा सामना खरंच खूप खास होता. हातून निसटलेला सामन्यात विजय मिळवणं खरंच खास असतं. या विजयाचं सर्व श्रेय हे मार्कस स्टोयनिसला  असल्याचे केएल राहुल याने सामन्यानंतर सांगितलं.

चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): अजिंक्य रहाणे, रुतुराज गायकवाड (कर्णधार), डॅरिल मिशेल, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), दीपक चहर, तुषार देशपांडे, मुस्तफिजुर रहमान, मथीशा पाथीराना.

लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक, केएल राहुल (विकेटकीपर/कर्णधार), मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, आयुष बडोनी, कृणाल पंड्या, मॅट हेन्री, रवी बिश्नोई, मोहसिन खान, यश ठाकूर.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.