Sharad Pawar | “मी राजकारणात कुणाला शत्रू मानत नाही, मात्र…; शरद पवारांचं सूचक विधान

Sharad Pawar | नाशिक: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार (Ajit Pawar) एकमेकांवर टीका करताना दिसले आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार आज पहिल्यांदाच नाशिकमध्ये जाहीर सभा घेणार आहेत. या सभेपूर्वी शरद पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. राजकारणात मी कुणाला शत्रू मानत नाही, असं विधान शरद पवार यांनी केलं आहे.

Is your enemy in politics Ajit Pawar or BJP?

राजकारणामध्ये तुमचा शत्रू अजित पवार आहे की भाजप? असा प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं उत्तर देताना शरद पवार म्हणाले, “राजकारणामध्ये मी कुणालाच शत्रू मानत नाही. मात्र, वैचारिक मतभेद असू शकतात. इथे कोणी कुणाचा कायमचा शत्रू नसतो.”

भाजपसोबत जाण्याचा निर्णय याआधी देखील घेण्यात आला होता. मात्र शेवटच्या क्षणी शरद पवारांनी माघार घेतली असा आरोप अजित पवार गटाकडून केला जात आहे. या प्रश्नाचं उत्तर देत शरद पवार म्हणाले, “आम्ही भाजपसोबत जाणार या चर्चा सुरू होत्या. राजकारणामध्ये चर्चा सुरूच असतात. मात्र, चर्चा करणं म्हणजे अंतिम निर्णय, असं होत नाही. मी पक्षातील सर्व लोकांचं ऐकूनच अंतिम निर्णय घेतला आहे.”

तुमचं वय 83 झालं आहे तुम्ही थांबणार आहात की नाही? असा खोचक टोला अजित पवारांनी शरद पवारांना लगावला होता. यावर उत्तर देत शरद पवार म्हणाले, “न तो टायर्ड हूं ना तो रिटायर्ड हुं.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.