पंकजा मुंडेंना मराठा आंदोलकांनी रोखले; पोलिसांची मराठा आंदोलकांना मारहाण

Pankaja Munde vs maratha reservation protest

Pankaja Munde । विद्यमान खासदार आणि बहीण प्रीतम मुंडे यांना डावलून भाजपने बीड लोकसभेची उमेदवारी पंकजा मुंडे यांना दिली आहे. त्यानंतर मुंडे यांनी प्रचाराला सुरवात केली आहे. इच्छा नसतानाही पक्षाचा आदेश मानून पंकजा मुंडे या लोकसभेच्या निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत.

दरम्यान, पंकजा मुंडे पावनधाम येथील सप्ताहाच्या कार्यक्रमासाठी आल्या होत्या, तिथे मराठा आंदोलकांनी त्यांची गाडी अडवत मराठा आंदोलकांनी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत पंकजा मुंडे यांना त्या कार्यक्रमाला जाण्यापासून रोखलं होते. पंकजा मुंडे यांच्या गाडीच्या (Pankaja Munde) समोर येऊन काही मराठा आंदोलक घोषणा देत होते.

आंदोलक मागे हटायला तयार नसल्याचे सांगत पोलिसांनी मराठा आंदोलकांना मारहाण केली आहे, लाठीमार करत आंदोलकांना बाजूला केले.

पंकजा मुंडेंचा करेक्ट कार्यक्रम देवेंद्र फडणवीसांनी केला असल्याचीही चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात सुरु आहे. राज्यात पुन्हा भाजपची सत्ता आली तर मुंडे या मुख्यमंत्री पदावर दावा करू शकतात. त्यांना यावेळी डावलणे भाजपला जड गेले असते. दुसरीकडे उद्धव ठाकरे गट पंकजा यांना मदत करणार असल्याचे ठाकरे यांनी यापूर्वीच जाहीर केले होते. त्यामुळे फडणवीसांची गोची होणार होती, यातून मार्ग काढत देवेंद्र फडणवीसांनी पंकजा मुंडे लोकसभेची उमेदवारी देत ‘करेक्ट कार्यक्रम’ केला असल्याची चर्चा आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.