Devendra Fadnavis | अलिबागमधील 19 बंगला घोटाळा प्रकरणी रश्मी ठाकरेंची चौकशी होणार? देवेंद्र फडणवीस म्हणतात…

Devendra Fadnavis | टीम महाराष्ट्र देशा: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची पत्नी रश्मी ठाकरेंवर (Rashmi Thackeray) भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी गंभीर आरोप केला होता. रश्मी ठाकरे यांनी अलिबागच्या जंगलात 19 बंगले बांधल्याचा गंभीर आरोप सोमय्या यांनी केला होता. त्याबद्दल त्यांनी संबंधित विभागात तक्रारही दाखल केली होती. या प्रकरणावर देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. त्यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

The government does not decide who to investigate and who not – Devendra Fadnavis

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी रिपब्लिकन भारत वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत या प्रकरणावर वक्तव्य केलं आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, “कुणाची चौकशी करायची आणि कुणाची नाही हे सरकार ठरवत नाही. हे सर्व पोलीस ठरवत असतात. उद्धव ठाकरे यांचं सरकार यामध्ये हस्तक्षेप करत होतं. मात्र, आम्ही यामध्ये हस्तक्षेप करत नाही. आम्ही त्यामध्ये हस्तक्षेप केला तर ती सिस्टीम व्यवस्थित काम करणार नाही.”

पुढे बोलताना ते (Devendra Fadnavis) म्हणाले, “पोलिसांना ज्या प्रकरणाची चौकशी करायची आहे, त्याची चौकशी ते करतील. मात्र, जो व्यक्ती आणि ज्या गोष्टी चुकीच्या असेल त्यांच्यावर कारवाई नक्की होईल.”

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. फडणवीस यांच्या या वक्तव्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पुन्हा एकदा नवा वाद सुरू होण्याची शक्यता झाली आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.