Deepak Kesarkar | टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री पदाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
दीपक केसरकर (Deepak Kesarkar) म्हणाले, “दोन्ही पक्ष मिळून मुख्यमंत्री पदाबाबत निर्णय घेणार आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढवणार, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यामुळे निवडणुकानंतर पक्षात काही बदल होणार असतील तर ते दोघांनी मिळून घेतले पाहिजे.”
Both parties have to make adjustments – Deepak Kesarkar
पुढे बोलताना ते (Deepak Kesarkar) म्हणाले, “दोन्ही पक्षांना ऍडजेस्टमेंट करून सरकार स्थापन करावं लागेल. काही काळ ते मुख्यमंत्री राहतील काही काळ आम्ही मुख्यमंत्री राहू. देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्यानुसार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली जाणार आहे.”
दरम्यान, रिपब्लिकन भारतीय वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाबाबत भाष्य केले आहे. राज्याचा पुढचा मुख्यमंत्री ठरवण्याचा निर्णय पक्षातील वरिष्ठ अधिकारी घेतील असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण (Deepak Kesarkar) आलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- Anil Deshmukh | सरकार आपल्याच एजन्सीकडून उदोउदो करून घेत आहे; अनिल देशमुख यांचा शिंदे-फडणवीस सरकारवर घणाघात
- Devendra Fadnavis | राज्याचा पुढचा मुख्यमंत्री कोण? देवेंद्र फडणवीस म्हणतात…
- Vijay Wadettiwar | जे काम देशाच्या पंतप्रधानांनी करायला हवं ते राहुल गांधी करत आहे; विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
- Raj Thackeray | भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना हिंदुस्तानात व्हावा हे न पटणार आहे; मनसे नेत्याची संतप्त प्रतिक्रिया
- Sanjay Raut | देवेंद्र फडणवीस कदाचित झोपेत बडबडत असतील; संजय राऊतांचा फडणवीसांना खोचक टोला