Share

भाजपकडून लोकशाही उद्ध्वस्त करण्याचे काम – शरद पवार

Sharad Pawar इंदापूर : ‘सत्ता डोक्यात जाते, तेव्हा लोकशाही उद्ध्वस्त होते. आता सत्ताधाऱ्यांवर टीका केली, तर मुख्यमंत्री, मंत्री आणि सत्ताधाऱ्यांविरोधात बोलणाऱ्यांना तुरुंगात जावे लागते. झारखंड आणि दिल्लीचे मुख्यमंत्री तुरुंगात आहेत. देशाची वाटचाल वेगळ्या दिशेने चालू आहे. भाजप लोकशाही उद्ध्वस्त करत आहे,’ अशी टीका शरद पवार यांनी केली.

जाहीर सभेत शरद पवार म्हणाले की, ”एका बाजूला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी आणि मिळाल्यानंतर देशाची सेवा केलेले लोक आणि दुसऱ्या बाजूला जात, धर्म, भाषेत दुरावा वाढवण्यासाठी सत्तेचा वापर करत असलेले लोक आमने-सामने उभे आहेत.

त्यामुळे सदसद्विवेकबुद्धीने मतदान करून सत्तेचा वापर स्वहितासाठी करणाऱ्यांना सत्तेच्या बाजूला ठेवा. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्यांना पक्षात घेऊन भ्रष्टाचारमुक्त करण्याचे काम भाजप करत आहे.”

destroying democracy by BJP said Sharad Pawar

महत्वाच्या बातम्या

Sharad Pawar इंदापूर : ‘सत्ता डोक्यात जाते, तेव्हा लोकशाही उद्ध्वस्त होते. आता सत्ताधाऱ्यांवर टीका केली, तर मुख्यमंत्री, मंत्री आणि सत्ताधाऱ्यांविरोधात …

पुढे वाचा

India Maharashtra Marathi News Politics