Amol Mitkari | टीम महाराष्ट्र देशा: अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘हे राज्य व्हावे सुराज्य ही जनतेची इच्छा’ ही जाहिरात अमोल मिटकरी यांनी शेअर केली आहे. या जाहिरातीवरूनच अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.
‘हे राज्य व्हावे सुराज्य ही जनतेची इच्छा’ या जाहिरातीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो छापण्यात आला आहे. मात्र, या जाहिरातीमध्ये कुठेही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा फोटो नाही. यावरून अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारला आहे.
Have you forgotten Balasaheb Thackeray?
बाळासाहेब ठाकरेंना विसरलात? जनता माफ करेल असं वाटतं का?, असा सवाल अमोल मिटकरी यांनी ट्विट करत उपस्थित केला आहे. अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांच्या या प्रश्नाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय उत्तर देतील? याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.
बाळासाहेब ठाकरेंना विसरलात? जनता माफ करेल असं वाटतं का?@mieknathshinde pic.twitter.com/35oOMe2yGz
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) June 30, 2023
दरम्यान, अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी ट्विट करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. ट्विट करत अमोल मिटकरी म्हणाले, “देवेंद्रजी फडणवीस वैफल्यग्रस्त झाले आहेत. नैराश्यातुन ते बेताल सुटले आहेत. पेशवे काळातील फडणीशी लोकशाहीत चालत नाही हे बहुतेक ते विसरलेत.मी त्यांच्या अनेक मुलाखती पाहतो मात्र परवा मुलाखतीत ते आतुन पोखरल्याचे व शिंदें सोबत बिनसल्याचे स्पष्ट जाणवते आहे.#नैराश्य”
महत्वाच्या बातम्या
- Nitesh Rane | संजय राऊतांनी बरबाद केलेल्या त्या डॉक्टर महिलेला आधी न्याय द्या; नितेश राणेंची शरद पवारांना विनंती
- Weather Update । पुण्यासह राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पाऊस; हवामान विभागाने दिली महत्वाची माहिती
- Nilesh Rane | “उद्धव ठाकरे साहेब याच्यातून काहीतरी शिका…”; शरद पवारांच्या वक्तव्यावरून निलेश राणेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
- Eknath Shinde | आदित्य ठाकरेंच्या मोर्चाला ‘चोर मचाये शोर’ म्हणतं भाजप-शिंदे गटाचं प्रत्युत्तर
- Amol Mitkari | देवेंद्र फडणवीस वैफल्यग्रस्त झाले – अमोल मिटकरी