Konkan Teachers Constituency | कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपचा उमेदवार विजयी; प्रतिक्रिया देत म्हणाले…

Konkan Teachers Constituency | ठाणे : राज्यातील पाच पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा पहिला निकाल हाती आला आहे. कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे (BJP) उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा विजय झाला आहे.

कोकण शिक्षक मतदारसंघात शेकापचे उमेदवार म्हणून बाळाराम पाटील विरुद्ध भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे निवडणूक लढत होती. विजयानंतर ज्ञानेश्वर म्हात्रे (Dnyaneshwar Mhatre) यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. हा केवळ माझा विजय नसून सगळ्या शिक्षकांचा विजय आहे, असं ज्ञानेश्वर म्हात्रे म्हणालेत.

पुढे ते म्हणाले, “33 शिक्षक संघटनांचा पाठिंबा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रामदास आठवले यांनी जो विश्वास माझ्यावर दाखवला. त्या विश्वासाची पूर्तता करता आली याचं समाधान आहे. मत देऊन विजयाच्या जवळ नेणाऱ्या माझ्या सगळ्या शिक्षक बांधवांचे मनापासून आभार. येत्या काळात चांगलं काम करायचंय. शिक्षकाच्या प्रश्नांना न्याय द्यायचा आहे.”

ज्ञानेश्वर म्हात्रे यांना पहिल्या फेरीत तब्बल 20 हजार 648 मते मिळाली. तर बाळाराम पाटील यांना 9768 मते मिळाली आहेत. एकूण 3002 मते अवैद्य ठरली आहेत. ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी विजयी मताचा 16 हजार मतांचा कोटा पूर्ण केल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आलं. ( Konkan Teachers Constituency )

महत्वाच्या बातम्या :

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.