Chandrakant Patil BJP | हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन करत भाजपने सुरू केली कसबा पोटनिवडणुकीची तयारी; काय आहे भाजपची रणनिती?

Chandrkanat Patil | पुणे : पुणे शहरातील कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी  भाजपसह सर्वच पक्षांच्या हालचाली सुरु आहेत. त्यातच पालकमंत्री, राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज सोमवारी तातडीने शहरातील प्रमुख नेत्यांची बैठक बोलाविली होती. या बैठकीत काय चर्चा झाली, उमेदवार निश्चित झाला का? भाजपची काय रणनिती, कार्यपद्धती असणार हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता होती. या पार्श्वभूमीवर ही बैठक संपल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी या बैठकीबाबत माध्यमाशी बोलताना माहिती दिली आहे.

काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

“मी आज हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो. आम्ही सगळेजण हे मानणारे आहोत की, बाळासाहेबांचे महाराष्ट्रावर महाराष्ट्राच्या विकासावर, हिंदुत्वाच्या रक्षणात एक मोठं योगदान आहे. त्यामुळे त्यांना अभिवादन करतो आणि या निवडणुकीची तयारी सुरू झाली असे घोषित करतो.” असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे.

“सगळ्यांनी आपली तयारी सुरू केली आहे. भाजपचे दोन्ही परंपरागत मतदारसंघ असूनही प्रत्येकच विषय पुरेसा आधी विचार करा आणि पुरेसा खोलवर विचार करा. अशी आमची कार्यपद्धती असल्याने मतदारसंघ हक्काचे असूनही आम्ही तयारीला लागलेलो आहोत. आज ही निवडणूक केवळ कसबा मतदारसंघाची नाही, पूर्ण शहराने ती निवडणूक होऊन केली पाहिजे म्हणून शहरातील ३० पेक्षा जास्त प्रमुख नेत्यांची आज माझ्या घरी बैठक झाली.”

“या बैठकीत सगळा सविस्तर विचार, उमेदवारांची चर्चा सोडून कारण उमेदवारांच्या विषयात आमचं नेहमीच धोरण असं असतं, की आपण सगळेजण कोरं पाकीट आहोत त्यावर जो पत्ता लिहिला जाईल त्यावर आपण जायचं असतं. त्यामुळे राज्याचे जे संसदीय बोर्ड आहे, आमच्या तीन समित्या असतात ते जे निर्णय करतील तो सगळ्यांना मान्य असतो. तोपर्यंत कमळ चिन्ह हाच उमेदवार असे मानून सगळ्यांनी कामाला सुरुवात केली आहे.”

महत्वाच्या बातम्या 

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.