Health Tips | दररोज नाश्त्यामध्ये पोहे खात आहात?, तर आरोग्याला भोगावे लागू शकतात ‘हे’ दुष्परिणाम

Health Tips | टीम महाराष्ट्र देशा: पोहे बहुतांश लोकांचा आवडता नाश्ता आहे. काही लोक सकाळच्या वेळी पोहे खातात, तर काहीजण संध्याकाळच्या चहाच्या वेळी नाष्टा म्हणून पोह्याचे सेवन करतात. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे पोहे बनवले जातात. हे खायला चविष्ट आणि बनवायला खूप सोपे आहे. त्यामुळे बहुतेक लोक सकाळच्या गडबडीमध्ये नाश्त्याला पोहे खातात. पण दररोज पोहे खाणे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. कोणत्याही गोष्टीचे अतिसेवन केल्याने आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. त्याचप्रमाणे दररोज पोह्यांचे सेवन केल्याने शरीराला नुकसान होऊ शकते. नियमित नाश्त्याला पोहे खाल्ल्याने शरीराला पुढील दुष्परिणाम भोगावे लागू शकतात.

वजन वाढू शकते

नाश्त्याला पोहे खाणे हे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर मानले जाते. मात्र, दररोज पोह्यांचे सेवन केल्याने तुमचे वजन झपाट्याने वाढवू शकते. कारण पोह्यांमध्ये भरपूर प्रमाणात कार्बोहायड्रेट उपलब्ध असते, ज्यामुळे वजन वाढू शकते. त्याचबरोबर अनेक ठिकाणी पोह्यामध्ये शेंगदाणे, बटाटे इत्यादी गोष्टींचा वापर करतात. शेंगदाणा आणि बटाट्याच्या नियमित सेवन आणि लठ्ठपणाची समस्या वाढू शकते. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी नियमित पोहे खाणे टाळले पाहिजे.

ॲसिडिटीची समस्या वाढू शकते

सकाळी नाश्त्याला पोहे खाल्ल्याने पोट बराच वेळ भरलेले राहते. पण पोह्यांच्या अतिरिक्त सेवनामुळे ॲसिडिटीची समस्या वाढू शकते. तर, काहींना सकाळी पोहे खाल्ल्याने पोटात कॅम्प यायला लागतात. त्यामुळे या सर्व समस्या टाळण्यासाठी नियमित पोहे खाणे टाळले पाहिजे.

रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते

डायबिटीसच्या रुग्णांना भात न खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण भात खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. पोहे देखील तांदळापासून बनवले जातात. त्यामुळे नियमित पोह्यांचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. त्यामुळे डायबिटीसच्या रुग्णांनी नियमित पोहे खाणे टाळले पाहिजे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.