Ajit Pawar | नरेंद्र मोदी यांच्यासारखं नेतृत्व आपल्याला देशात कुठेच पाहायला मिळणार नाही – अजित पवार

Ajit Pawar | नाशिक: अजित पवार आज नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिक शहरामध्ये आज एकनाथ शिंदे (Eknath Shinde), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत शासन आपल्या दारी हा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमापूर्वी अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.

भारतामध्ये नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासारखं नेतृत्व कुठंच पाहायला मिळणार नाही, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे. अजित पवार यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

We are all working as a family – Ajit Pawar

पत्रकारांशी बोलत असताना अजित पवार म्हणाले, “राज्य सरकारमध्ये ताकतीचा प्रश्न नाही. एक परिवार म्हणून आम्ही सर्वजण काम करत आहोत. नरेंद्र मोदी यांच्यासारखं नेतृत्व आपल्या देशात नाही, हे सर्वांना मान्य करावं लागेल.

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 09 वर्षात अनेक विकास कामं झाली आहे. वंदे भारत एक्सप्रेसच्या माध्यमातून सरकारनं जनतेला चांगली सुविधा पुरवली आहे.”

पुढे बोलताना ते म्हणाले, “खातेवाटप झाल्यानंतर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि आमची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये मंत्र्यांची नाराजी आणि मंत्र्यांचं म्हणणं ऐकून घेतलं जाणार आहे.

महाराष्ट्राची जी संस्कृती आहे, त्याचबरोबर यशवंतराव चव्हाण यांनी घडवलेला जो महाराष्ट्र आहे, त्याच पद्धतीनं आम्ही काम करणार आहोत. शेवटी चर्चा करून प्रश्न सुटतात. त्यामुळे आम्ही बैठक बोलवणार आहोत.

“आमच्या महायुती सरकारमध्ये आमदारांच्या मनात कटूता राहू नये, याकडं आम्ही विशेष लक्ष देणार आहोत. कारण आम्ही जनतेच्या कल्याणाकरता काम करत आहोत. त्यामुळं मंत्र्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव होणार नाही.

जो काम करतो तो चुकतो. त्यामुळं महाविकास आघाडी सरकारमध्ये माझ्याकडून काही चुका झाल्या असतील, तर त्या मी सुधारेल. त्यामुळे शिंदे गटातील आमदारांच्या काही तक्रारी असतील आणि त्यांच्या तक्रारीमध्ये काही तथ्य असेल, तर त्याकडं मी लक्ष देईल आणि तशा प्रकारची चूक मी पुन्हा करणार नाही”, असही ते यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.