Rohit Sharma करणार तीन मोठे विक्रम; अशी कामगिरी करणारा रोहित पहिलाच खेळाडू

Rohit Sharma IPL record

Rohit Sharma । मुंबई इंडियन्स संघ IPL 2024 मधील पहिला सामना आज गुजरात टायटन्सविरुद्ध खेळणार आहे. हा सामना ७ वाजून ३० मिनीटांनी नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे खेळला जाणार आहे. या हंगामात मुंबईचे नेतृत्व हार्दिक पांड्या करताना दिसणार आहे. रोहित शर्माऐवजी कर्णधार म्हणून हार्दिकची निवड करण्यात आली आहे, त्यामुळे Rohit Sharma यावेळी फलंदाज म्हणून IPL 2024 खेळणार आहे. तसेच रोहित या IPL मध्ये तीन मोठे विक्रम करणार आहे.

First player to play 200 matches for MI

रोहित शर्माने IPL मध्ये आतापर्यंत २४३ सामने खेळले आहेत, त्यापैकी त्याने MI कडून १९८ सामने खेळले आहेत. रोहितने आणखीण २ सामने खेळल्यानंतर तो मुंबईसाठी २०० सामने खेळणारा पहिला खेळाडू ठरणार आहे. रोहितने त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील पहिले ३ हंगाम डेक्कन चार्जर्स संघासाठी खेळले ज्यामध्ये त्याने ४५ सामने खेळले. त्याच्यानंतर कायरन पोलार्डने मुंबईसाठी सर्वाधिक सामने खेळले आहेत, त्याने एकूण १८९ सामने खेळले आहेत.

Rohit Sharma to complete 100 catches in IPL

IPL मध्ये आतापर्यंत सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रम सुरेश रैनाच्या नावावर असून त्याने एकूण १०९ कॅच घेतले आहेत. तर रोहित शर्माने आयपीएलमध्ये आतापर्यंत ९८ कॅच घेतले आहेत. या हंगामात दोन झेल घेतल्यानंतर रोहित आपले आयपीएल मधील १०० कॅच पूर्ण करणार आहे.

सर्वाधिक कॅच घेण्याच्या यादीत रैनानंतर विराट कोहली दुसऱ्या स्थानावर आणि कायरन पोलार्ड तिसऱ्या स्थानावर आहे, तर रोहित शर्मा सध्या चौथ्या स्थानावर आहे. विराट कोहलीने १०६ कॅच तर कायरन पोलार्डने १०३ कॅच घेतले आहेत. रोहित नंतर रवींद्र जडेजाने ९७ झेल घेतले आहेत.

Rohit sharma IPL 2024 six record

रोहित शर्माने T20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत 487 सिक्स लगावले आहेत, त्यामुळे या हंगामात त्याने १३ सिक्स मारले की तो आपले ५०० T20 सिक्स पूर्ण करेल. अशी कामगिरी केल्यानंतर तो IPL T20 फॉरमॅटमध्ये ५०० षटकार मारणारा पहिला भारतीय खेळाडू ठरणार आहे.

रोहित शर्माने मुंबई इंडियन्सला आतापर्यंत ५ वेळा आयपीएल ट्रॉफी मिळवून दिली आहे. रोहित शर्मा हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार आहे, तसेच MI हा सुद्धा आयपीएलमधील सर्वोत्कृष्ठ संघ आहे.

रोहित शर्माने आयापीएलमध्ये आतापर्यंत एकूण २४३ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये ६२११ धावा केल्या आहेत. यामध्ये ४२ अर्धशतके लगावली आहेत तर एक शकत लगावले आहे.

Mumbai Indians Playing 11

हार्दिक पांड्या (कर्णधार), रोहित शर्मा, इशान किशन (यष्टिरक्षक), टीम डेव्हिड, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद नबी, आकाश मधवाल, पियुष चावला, जेराल्ड कोएतझी, नेहल वढेरा

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.