IPL तर सोडाच WPL सोबत सुद्धा बरोबरी करु शकत नाही पाकिस्तान सुपर लीग

IPL vs PSL | पाकिस्तान सुपर लीगच्या नवव्या हंगामाचे विजेतेपद इस्लामाबाद यूनाइटेड या संघाने पटकावले आहे. १८ मार्चला कराचीच्या नॅशनल स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात इस्लामाबाद यूनाइटेडने मुल्तान सुल्तान संघाला २ विकेटने पराभूत केले आहे.

मुल्तान सुल्तान संघाचा अंतिम सामन्यातील सलग तिसरा पराभव आहे तर इस्लामाबाद यूनाइटेड संघ हा दुसऱ्यांदा चॅम्पियन बनला आहे. पीएसएल विजेत्या आणि उपविजेत्या संघांना एकत्र जेवढे मानधन मिळाले तेवढे मानधन भारतातील महिला प्रिमियर लीगच्या विजेत्या संघाला दिले जाते.

पीएसएलची ट्राॅफी जिंकणाऱ्या इस्लामाबाद यूनाइटेडला पाकिस्तानी १४ कोटी रुपये म्हणजेच भारतीय ४.१३ कोटी रुपये मिळाले आहेत. तसेच उपविजेत्या मुल्तान सुल्तान संघाला १.६५ कोटी रुपये मिळाले आहेत.

PSL विजेते आणि उपविजेते यांची एकत्रित रक्कम महिला प्रीमियर लीग चॅम्पियन RCB पेक्षाही कमी आहे. डब्लूपीएलमध्ये चॅम्पियन आरसीबीला ६ कोटी रुपये मिळाले आहेत. तसेच उपविजेत्या दिल्ली कॅपिटल्सला ३ कोटी रुपये मानधन मिळाले आहे.

PSL 2024 च्या अंतिम सामन्यात मुलतान संघाने २० षटकात ९ गडी गमावून १५९ धावा केल्या. मुलतानकडून उस्मान खानने ५७, इफ्तिखार अहमदने ३२ आणि कर्णधार मोहम्मद रिझवानने २६ धावा केल्या.

तर इस्लामाबादकडून इमाद वसीमने ५ आणि कर्णधार शादाब खानने ३ विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात इस्लामाबादसाठी मार्टिन गप्टिलने ५० धावा, आझम खानने ३० धावा आणि इमादने १९ धावा करत संघाला दोन गडी राखून विजेतेपद मिळवून दिले.

इस्लामाबाद यूनाइटेडने १० पैकी ५ सामने जिंकले होते. गुणतालिकेत संघ तिसऱ्या क्रमांकावर होता. मुल्तान सुल्तानने १० पैकी ७ सामने जिंकून संघ गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर होता.

महत्त्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.