Cyber Crime | ऑनलाईन आर्थिक फसवणूक झाल्यास तक्रार कुठे अन् कशी कराल?

Where and how to complain in case of online financial fraud?

पुणे : भारतात Cyber Crime ची प्रकरणे वाढत असल्याचे रोजच्या बातम्यांवरून लक्षात येते. बऱ्याच प्रकरणांमध्ये, लोक सायबर गुन्ह्यांची तक्रार करत नाहीत; कारण सायबर फसवणूक झाल्यावर त्याची तक्रार कुठे आणि कशी करायची याची माहितीच नसते.

इंटरनेटचा वापर करून गुन्हेगार पीडितांकडून पैसे किंवा संवेदनशील माहिती चोरतात. Cyber Crime ची तक्रार करण्यासाठी, पीडितांकडे दोन पर्याय आहेत. जवळच्या पोलिस स्टेशनला भेट देऊ शकतात किंवा cybercrime.gov.in द्वारे ऑनलाइन तक्रार दाखल करू शकतात. अथवा १९३० हा टोल फ्री नंबर डायल करूनसुद्धा तक्रार नोंदवता येते.

Cyber Crime । Where and how to complain in case of online financial fraud?

१. https://cybercrime.gov.in/ भेट द्या

२. मुख्यपृष्ठावरील ‘तक्रार दाखल करा’वर क्लिक करा.

३. अटी व शर्ती वाचा आणि ‘मी स्वीकारतो’वर क्लिक करा.

४. ‘रिपोर्ट सायबर क्राईम’वर क्लिक करा.

५. ‘नवीन वापरकर्त्यासाठी येथे क्लिक करा’ निवडा आणि तुमचे राज्य, नाव, ईमेल, फोन नंबर आणि इतर आवश्यक तपशील प्रविष्ट करा.

६. तुमच्या नोंदणीकृत फोन नंबरवर पाठवलेला ओटीपी एंटर करा आणि कॅप्चा काेड भरा, त्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा.

७. फॉर्ममध्ये तुम्हाला ज्या Cyber Crime ची तक्रार करायची आहे त्याचे तपशील भरा, जे चार भागांमध्ये विभागलेले आहे: सामान्य माहिती, बळी माहिती, सायबर गुन्ह्यांची माहिती आणि पूर्वावलोकन.

८. सर्व संबंधित तपशील आणि गुन्ह्याचे सहायक पुरावे, जसे की स्क्रीनशॉट किंवा फाइल समाविष्ट केल्याचे सुनिश्चित करा.

९. एकदा तुम्ही माहितीचे पुनरावलोकन आणि पुष्टी केल्यानंतर, ‘सबमिट’ बटणावर क्लिक करा. गोल्डन अवरमध्ये करा तक्रार : गोल्डन अवर म्हणजेच फसवणूक झाल्यानंतरचा एक तास महत्त्वाचा असतो, फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यास तातडीने सायबर पोलिसांशी संपर्क साधा. त्यामुळे पोलिसांना तुमचे पैसे ज्या खात्यात गेले असतील, ते गोठवणे शक्य होऊ शकते. आणि गेलेले पैसे परत मिळणे शक्य होऊ शकते.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.