IPL 2024 । महेंद्र सिंह धोनीची डोकेदुखी वाढली; कॉनवे-पाथिरानानंतर CSK चा दिग्गज खेळाडू जखमी

IPL 2024 MS Dhoni Chennai Super Kings Key Players Injured

IPL 2024 : आयपीएलचा 17 वा हंगाम सुरु होण्यासाठी काहीच दिवस उरलेत. त्यापूर्वी सीएसकेला एकामागून एक धक्के बसत आहेत. सीएसकेचा सलामीवीर डेव्हॉन कॉनवे अगोदरच दुखपतीमुळे सुरुवातीचे सामने खेळू शकणार नाही. त्यानंतर युवा वेगवान गोलंदाज मथीशा पाथिरानाला सुद्धा दुखापत झाली होती. आता या यादीत मुस्तफिजुर रहमानचेही नाव समाविष्ट झाले आहे.

बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील सामन्यात बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमान गोलंदाजी करत असताना क्रॅम्पमुळे खेळपट्टीवर पडला आणि त्याला दुखापत झाली. त्यामुळे त्याला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर घेऊन जाण्यात आले. त्याच्या दुखापतीमुळे चेन्नई सुपर किंग्सला मोठा धक्का बसणार आहे..

IPL 2024 | Chennai Super Kings Key Players Injured

श्रीलंकेचा मथिशा पाथिराना गेल्या काही काळापासून जखमी आहे. तो बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतही खेळू शकला नाही. CSK साठी डेथ ओव्हर्समध्ये पाथीरानाने महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. यावेळीही त्याच्याकडून तशीच अपेक्षा होती. परंतु दुखापतीमुळे तो पहिल्या काही सामन्यांमध्ये खेळण्याची खात्री नाही. त्यामुळेच संघ मुस्तफिजुर रहमानकडे पर्याय म्हणून पाहत होता, परंतु आता तो सुद्धा जखमी झाला आहे.

गतविजेत्या सीएसकेचा पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बँगलोर सोबत एम. ए चिदंबरम स्टेडियम चेन्नई येथे 22 मार्चला होणार आहे. त्यापूर्वी मुस्तफिजुर तंदुरुस्त होईल अशी आशा फार कमी आहे. त्यामुळे चेन्नईसाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.