IPL 2024 भारतात होणार की भारताबाहेर? महत्वाची बातमी आली समोर

IPL 2024 schedule update

IPL 2024  | इंडियन प्रिमीयर लीगचा १७ वा हंगाम २२ मार्चपासून सुरु होत आहे. पहिल्या टप्प्यातील २१ सामन्यांचे वेळापत्रक बीसीसीआयने जाहीर केले आहे. आयपीएल सुरू होण्यापुर्वी लोकसभा निवडणूकांच्या तारखा जाहिर झाल्या आहेत. त्यामुळे आयपीएलचे उर्वरित सामने भारताबाहेर होणार का? या चर्चांना उधान आले होते. परंतु बीसीसीआय अध्यक्ष जय शहा यांनी या चर्चांना पुर्णविराम दिला आहे.

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी क्रिकबझला सांगितले की, संपूर्ण लीग भारतात आयोजित केली जाईल, ती परदेशात हलवण्याचा कोणताही विचार नाही. तसेच आयपीएल चेअरमन अरूण धुमल यांनी IPL 2024  ही भारतातच होणार असल्याचे सांगितले आहे, त्यामुळे ७ एप्रिलनंतरही स्पर्धा भारतातच आयोजित केली जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आयपीएल मे 2024 अखेरपर्यंत चालेल आणि त्यानंतर टी-२० विश्वचषक सुरू होईल.

दोन दिवसांपूर्वी आयपीएल UAE मध्ये खेळवली जाणार असल्याच्या चर्चांना उधान आल होत. यासाठी बीसीसीआयचे वरिष्ठ अधिकारी यूएईला दाखल झाले असल्याचेही वृत्त समोर आले होते. यापूर्वीही IPL दुबईत खेळवली गेली आहे. त्यामुळे हा पर्याय होऊ शकतो असे सांगण्यात आले.

IPL 2024 schedule update

लोकसभा निवडणुकीमुळे यापूर्वी दोनदा आयपीएलचे आयोजन भारताबाहेर करण्यात आले होते. २००९ मध्ये निवडणुकीमुळे संपूर्ण स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतही असेच काहीसे घडले होते. त्यानंतर निवडणुका सुरू होण्यापूर्वी काही भाग भारतात झाला आणि त्यानंतर पुढचा भाग यूएईमध्ये खेळला गेला. २०१९ मध्ये मात्र संपूर्ण स्पर्धा भारतात आयोजित करण्यात आली होती.

लोकसभेच्या निवडणुकांना १९ एप्रील २०२४ पासून सुरुवात होणार आहे आणि ४ जूनला निकाल लागणार आहे. ७ टप्यांमध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत, त्यामुळे बीसीसीआयला आयपीएलच्या दूसऱ्या टप्प्यातील सामन्यांचे नियोजन निवडणूकांच्या सर्व तारखा लक्षात घेवून करावे लागणार आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.