Ajit Pawar यांच्या विरोधात अख्खं पवार कुटुंब एकवटलं; पवारांच्या चक्रव्युहात अडकले अजित पवार

Ajit Pawar Vs Pawar Family : सख्खे भाऊ, भावजय, पुतणे हे अजित पवारांच्या विरोधात गेले आहेत. त्यामुळे अजित पवार हे कुटुंबात एकटे पडल्याचे चित्र

Explained । Ajit Pawar Vs Pawar Family |  कुटुंबात मला एकटे पाडले जाईल, तुम्ही तरी मला साथ द्या अशी भावनिक हाक अजित पवारांनी (Ajit Pawar) बारामतीत कार्यकर्त्याना दिली होती. त्यानंतर आता अजित पवारांना कुटुंबात एकटं पाडल्याचं दिसत आहे.

अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार (Shrinivas Pawar) यांनी अजित पवारांच्या विरोधात भूमिका घेतली. तर भावजय शर्मिला पवार देखील सुप्रिया सुळे यांचा प्रचार करत आहेत. अजित पवारांचे भाजपसोबत जाणं हे पवार कुटुंबीयांना आवडलेले नाही.

अजित पवारांच्या विरोधात श्रीनिवास पवार मैदानात उतरले आहेत. त्यामुळे अजित पवारांचे समर्थक श्रीनिवास पवार यांचा विरोध करत आहेत. तर शरद पवारांचे समर्थक श्रीनिवास पवार यांचे समर्थन करत आहेत.

पुतण्या युगेंद्र पवार काकांच्या ( अजित पवार ) विरोधात 

अजित पवारांचा सख्खा पुतण्या युगेंद्र पवार अजित पवारांच्या विरोधात मैदानात उतरला. युगेंद्र हा सुप्रिया सुळे यांचा बारामतीत प्रचार करतो आहे. दर निवडणुकीप्रमाणे यंदाही पवार कुटुंबातले माझे भाऊ, वहिनी, भाचे माझा प्रचार करतील असं सुप्रिया सुळे बारामतीत म्हणाल्या होत्या.

काही दिवसापूर्वी बारामतीकरांची भूमिका या नावाने एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यामध्ये पवार कुटुंबातील अंतर्गत वाद समोर आला होता.

निनावी पत्रात अजित पवारांनी बंड का केले? तिसऱ्या पिढीसाठी पार्थ ऐवजी रोहित पवार याची निवड केल्यापासूनच अजितदादा आणि पवार कुटुंबीयातलं अंतर वाढत गेल्याचा दावा या पत्रात करण्यात आला आहे.

ज्यावेळी अप्पासाहेब पवारांचा थेट वारसदार म्हणून तिसऱ्या पिढीतील वारसदार अशी कोणाची निवड करायची, असा प्रश्न उभा राहिल्यावर पार्थ आणि रोहित अशी नावे समोर आली होती. मात्र, आप्पासाहेबांचा थेट वारसदार म्हणून रोहित यांची निवड करून अप्रत्यक्षपणे राजेंद्र पवारांना न्याय देण्यात आला. तेव्हापासूनच खरा जळफळाट सुरू झाला होता.

सुप्रिया सुळे यांची कार्याध्यक्षपदी निवड झाल्यानंतर धाराशीवच्या काड्या पेटल्या आणि तोफांना बत्त्या लागल्या. म्हणून सामान्य बारामतीकरांची हीच भूमिका आहे की “वाजवा तुतारी गाडा गद्दारी’ असं या निनावी पत्रात म्हटलं आहे.

Ajit Pawar Vs Pawar Family । Social Media Viral Letter 

ncp

पत्रावरून राजेंद्र पवारांनी थेट अजित पवारांवर निशाणा साधला होता. ते म्हणाले, जेव्हा लोकांना दबावातून व्यक्त होता येत नाही तेव्हा पत्रातून व्यक्त होतात. जर मी तेव्हा राजकारणात आलो असतो तर तेव्हाच आताची परिस्थिती निर्माण झाली असती असंही राजेंद्र पवार म्हणाले आहेत. राजेंद्र पवारानंतर सुनंदा पवार आणि सई पवार या सुनेत्रा पवार यांच्या विरोधात इंदापूरमध्ये प्रचार करताना पाहायला मिळाल्या.

युगेंद्र पवार, सुनंदा पवार, सई पवार, राजेंद्र पवार आणि त्यानंतर आता शर्मिला पवार आणि श्रीनिवास पवार हे अजित पवारांच्या विरोधात गेले आहे, रोहित पवार तर आधीपासूनच काकांच्या विरोधात भूमिका घेताना दिसले आहेत.

इंदापूर आणि पुरंदरमध्ये अजित पवारांना विरोध

इंदापुरात हर्षवर्धन पाटील तर पुरंदरमध्ये विजय शिवतारे हे अजित पवारांना विरोध करताना पाहायला मिळत आहेत. तर विजय शिवतारे यांनी थेट बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले.

सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार लढणार आहेत. सुनेत्रा पवारांनी प्रचार देखील बारामतीत सुरू केला आहे. बारामती मतदार संघात सुनेत्रा पवार आणि जय पवार हे घरोघरी जाऊन लोकांच्या भेटीगाठी घेत आहेत.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.