लोक इतकं पोरकट बोलतात; Sharad Pawar यांचा शिंदे -फडणवीसांना टोला

Sharad Pawar Open Challenge To Devendra Fadnavis Over Manoj Jarange Patil Allegations

 Sharad Pawar । एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे यांच्यावर शरद पवारांनी लिहून दिलेली स्क्रिप्ट बोलत असल्याचा आरोप केला होता. यावर शरद पवारांना प्रश्न विचारल्यावर त्यांनी प्रतिक्रिया देत शिंदे-फडणवीस यांचा चांगलाच समाचार घेतला.

“खरं सांगायचं झालं तर जबाबदार लोकांचं वक्तव्य जबाबदार असलं पाहिजे. जबाबदार लोक इतकं पोरकट बोलतात हे महाराष्ट्रात कधीही पाहिलं नाही. मी महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण यांच्यापासून आजच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत अनेक लोकांचे वक्तव्ये पाहिले.

जरांगे यांचा माझ्यासोबत संबंध बोलायचं गेलं तर त्यांचं उपोषण सुरु झाल्यानंतर मी पहिल्यांदा गेलो होतो. मी त्यांना भेटून एवढंच सांगितलं होतं की, तुमच्या मागण्या संदर्भातील आग्रह समजू शकतो. पण दोन समाजात अंतर वाढेल असं काही करु नका. महाराष्ट्राचं सामाजिक ऐक्य टिकेल, असं करा.

‘जरांगेंना एक फोन जरी केल्याचं सिद्ध केलं तर मी…’, Sharad Pawar यांचे फडणवीसांना चॅलेंज

तुमच्या समाजासाठी आग्रही समजू शकतो. पण इतर समाजासाठी हे योग्य दिसणार नाही. एवढाच त्यांचा आणि माझा संवाद झालाय. त्यानंतर आजपर्यंत एका शब्दाने माझं आणि त्यांचं बोलणं नाही किंवा भेट नाही. असं असताना शिंदे-फडणवीस यांचे स्टेटमेंट असभ्य वाटतंय”, अशा शब्दांत शरद पवारांनी समाचार घेतला.

“त्यांना मेंदू मर्यादीत आहे. त्यांच्याबद्दल काय बोलायचं?” । Sharad Pawar

भाजप नेते आशिष देशमुख यांनी शरद पवार हे मनोज जरांगे यांना लोकसभेची उमेदवारी देणार, असा दावा केलाय. याबाबत शरद पवार यांना प्रश्न विचारला असता त्यांनी हसत उत्तर दिलं.

“आमच्यावर अशी इतकी वेळ आली?” असे म्हणत “कोण म्हटलं?”असा उलटप्रश्न पवारांनी केला. त्यावर आशिष देशमुख यांचं नाव सांगितलं. त्यानंतर शरद पवारांनी “त्यांना मेंदू मर्यादीत आहे. त्यांच्याबद्दल काय बोलायचं?”, अशी टीका शरद पवारांनी देशमुख यांच्यावर केली.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.