Sanjay Raut | मानसिक स्वास्थ्य ठीक नसलेल्या व्यक्तीच्या हातात राज्याचा कारभार – संजय राऊत

Sanjay Raut | मुंबई: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या बंडाला एक वर्ष पूर्ण झालं आहे. वर्षपूर्तीनंतर या बंडाबाबत अनेक खळबळजनक खुलासे होत आहेत. अशात शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी मोठा खुलासा केला होता. एकनाथ शिंदे यांचं ऑपरेशन जर यशस्वी झालं नसतं तर शिंदे यांनी गोळी झाडून घेतली असती, असं दीपक केसरकर म्हणाले होते. केसरकर यांच्या या वक्तव्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

How can a mentally ill person lead a state? – Sanjay Raut

संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “मनात आत्महत्येचा विचार येणारी व्यक्ति राज्याच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान आहे. मानसिक स्वास्थ ठीक नसलेल्या व्यक्तीच्या हातात राज्याचा कारभार आहे. मानसिक स्वास्थ बिघडलेली व्यक्ती राज्याचं नेतृत्व कसं करणार?”

पुढे बोलताना ते (Sanjay Raut), “दीपक केसरकर यांची चौकशी व्हायला हवी. एकनाथ शिंदे आत्महत्याचा विचार करत आहे, हे दीपक केसरकर यांना माहीत होतं. त्यांनी हे सिक्रेट इतक्या दिवस लपवून ठेवलं आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी.

दरम्यान, सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी बंडाबाबत मोठा खुलासा केला आहे. “बंडावेळी महाविकास आघाडीतील 20 आमदार आमच्या सोबत यायला तयार होते. मात्र, त्यावेळी त्यांना आमच्या सोबत येणे शक्य झाले नाही. मात्र, सध्या ते आमदार महाविकास आघाडीमध्ये असले तरी ते मनाने शिंदे-फडणवीस सरकार सोबत आहे.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.