रोहित शर्माच्या चाहत्यांसाठी खुशखबर; हार्दिकसह ‘हे’ दिग्गज खेळाडू IPL 2024 मधून बाहेर?

Hardik Pandya, MS Dhoni, Suryakumar Yadav and Mohammed Shami Likely Miss IPL 2024 Tournament

Indian Premier League 2024
  • Hardik Pandya, MS Dhoni, Suryakumar Yadav and Mohammed Shami Likely Miss IPL 2024 Tournament

IPL 2024 : रोहित शर्माच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. आयपीएल २०२४ स्पर्धेपूर्वी  मुंबई इंडियन्सने  (MI) संघात मोठे फेरबदल केले आहेत. IPL 2024 सुरू होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्याला आपल्या संघात सामील करुन कर्णधार पद दिले होते.

हार्दिकला कर्णधार केल्याने मुंबई इंडियन्सने फॅन्स नाराज झाले होते. काही दिवसांपूर्वी हार्दिक पंड्या गुजरातची टीम सोडून पुन्हा मुंबई इंडियन्सकडे परत आला होता.

दरम्यान, रोहित शर्माच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. रोहित शर्मा पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनण्याची शक्यता झाली आहे. हार्दिक पंड्या टाचेच्या दुखापतीमुळे IPL 2024 मधून बाहेर पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Hardik Pandya, MS Dhoni, Suryakumar Yadav and Mohammed Shami Likely Miss IPL 2024 Tournament

आयसीसी वर्ल्डकपदरम्यान हार्दिकच्या (Hardik Pandya) टाचेला दुखापत झाली होती, तेव्हापासून तो मैदानाबाहेर आहे. त्याच्या फिटनेसवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या टी -२० मालिकेला देखील हार्दिक खेळणार नाही आहे.

परंतु, हार्दिक पंड्या IPL 2024 मधून बाहेर पडणार असल्याने संघ मालकांची धाकधूक वाढली आहे. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला संघात घेण्यासाठी गुजरात टायटन्सला १०० कोटी रुपये दिले असल्याची माहिती आहे.

नुकताच आयपीएलचा लिलावही (IPL Auction) पार पडला आहे. ऑस्ट्रेलियाचा डावखुरा गोलंदाज मिचेल स्टार्क (mitchell starc) आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा गोलंदाज ठरला आहे.

हार्दिक पांड्यासह महेंद्रसिंह धोनी (Mahendra Singh Dhoni), सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि मोहम्मद शमी (Mohammed Shami) यांच्या फिटनेसवर देखील प्रश्नचिन्ह आहे.

साऊथ आफ्रिकेविरुद्ध झालेल्या टी -२० मालिकेच्या तिसऱ्या सामन्या दरम्यान सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) दुखापत झाली होती. त्यानंतर सूर्या वॉकरच्या सहाय्याने चालताना दिसून येत आहे. त्यामुळे तो आयपीएल खेळणार की नाही हे अजून स्पष्ट झालेले नाही.

महेंद्रसिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) त्याच्या गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त आहे. धोनी त्याच्या गावी गेला होता, तेव्हा त्याला पायऱ्या उतरतानादेखील त्रास होत असल्याचे दिसून आले.

वर्ल्डकपमध्ये मोहम्मद शमीचा (Mohammed Shami) बोलबाला दिसून आला. मात्र त्यानंतर शमी खेळण्यासाठी पूर्णतः फिट नसल्याचे सांगत त्याला साऊथ आफ्रिकेविरुद्ध कसोटी आणि वनडे मालिकेतून वगळण्यात आले.

पूर्णपणे फिट नसल्या कारणाने महेंद्रसिंह धोनी, हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादव, मोहम्मद शमी हे दिग्गज खेळाडू IPL 2024 मधून बाहेर पडण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.