Kunal Tilak – कसब्यात भाजपच्या पराभवानंतर कुणाल टिळकांची प्रतिक्रिया म्हणाले…

Kunal Tilak | Kasba pune Election | कसबा पुणे: काही दिवसांपासून कसबा पुणे आणि चिंचवड पोटनिवडणुकीवर जनतेचं अधिकच लक्ष पहायला मिळत होत. एवढच नाही तर काही दिवसांपूर्वी भाजपाने पोलीस यंत्रणा हाताशी घेऊन पैसे वाटले असल्याचा आरोप धांगेकरांनी केला. त्याचप्रमाणे या घडलेल्या घटनेमुळे धंगेकरांना विजय मिळवण्यासाठी ही घडलेली घटना टर्निंग पॉइंट असल्याचं म्हटल जातंय. गेल्या अनेक वर्षांपासून कसबा पुणे येथे भाजपची सत्ता होती. आता महविकास आघाडीनं यावर आपला झेंडा रोवला. यावर मुक्ता टिळक यांचे चिरंजीव कुणाल टिळकांनी प्रतिक्रिया दिली आहे.

रवींद्र धंगेकारांचं त्यांनी अभिनंदन केलं. “भाजप कुठ कमी पडल हे पाहण गरजेचं आहे.”अस देखील ते म्हणाले होते. त्याचप्रमाणे भाजपमधील नेहमी कसबा येथे ब्राह्मण उमेदवाराला उमेदवारी दिली जाते. तो निवडून देखील येतो. परंतु अशावेळी त्यांना उमेदवारी न दिल्याने ते नाराज असल्याच्या चर्चा देखील होत आहेत. एवढच नाही तर अनेक वर्षांपासून कसबा हे भाजपचा बालेकिल्ला होता. आज तो महविकास आघाडीच्या हातात आला आहे.

मुक्ता टिळकांनंतर ही उमेदवारी कुणाल टिळक यांना दिली जाईल अशी चर्चा होती. परंतु ही उमेदवारी हेमंत रासने यांना दिली होती. यांच्या प्रचारसभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रॅली काढली होती. तरी देखील या जागेवर काँग्रेसने विजयी मिळवला आहे.

कुणाल टिळकांचा इशारा तर नाही ना ? ( Kunal Tilak Warn BJP )

पराभवानंतर भाजपने आपण कुठ कमी पडलो ह पाहावं असं विधान केलं आहे. या विधानामागे नेमका कुणाल टिळकांचं काय म्हणणं आहे यावर आता चर्चेला उधाण आलंय. त्यांना उमेदवारी न दिल्यामुळे त्यांनी अस विधानं केलं असावं असं समजतंय.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.