Mustard Oil | केसांना मोहरीचे तेल लावल्याने मिळतात ‘हे’ अनोखे फायदे

Mustard Oil | टीम कृषीनामा: मोहरीचे तेल बहुतांश घरामध्ये स्वयंपाकासाठी वापरले जाते. मोहरीचे तेल आपल्या आरोग्यासोबत त्वचेसाठी खूप फायदेशीर मानले जाते. त्याचबरोबर केसांची काळजी (Hair Care) घेण्यासाठी मोहरीचे तेल उपयुक्त ठरू शकते. मोहरीच्या तेलामध्ये आढळणारे गुणधर्म केसांच्या समस्या सहज दूर करतात. यामध्ये अँटीऑक्सिडंट, अँटी फंगल, अँटीबॅक्टरियल आणि अँटिइफ्लेमेटरी गुणधर्म आढळून येतात. त्यामुळे केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा मोहरीचे तेल केसांना लावू शकतात. हे तेल तुम्हाला कोमट करून केसांवर लावावे लागेल. या तेलाचा वापर केल्याने केसांच्या पुढील समस्या सहज दूर होऊ शकतात.

केसातील कोंडा दूर होतो (Removes dandruff-Mustard Oil Benefits)

मोहरीच्या तेलामध्ये अँटी फंगल आणि अँटी बॅक्टरियल गुणधर्म आढळून येतात, जे केसातील घाण दूर करण्यास मदत करतात. त्यामुळे तुम्हाला जर टाळूमध्ये एलर्जी किंवा संसर्ग झाला असेल तर तुम्ही मोहरीच्या तेलाचा वापर करू शकतात. त्याचबरोबर मोहरीच्या तेलाच्या नियमित वापराने केसातील कोंड्याची समस्या देखील सहज दूर होते.

केस तुटणे थांबते (Stops hair fall-Mustard Oil Benefits)

तुम्ही जर केस तुटण्याच्या समस्येपासून त्रस्त असाल, तर मोहरीचे तेल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. मोहरीच्या तेलाने टाळूची मालिश केल्याने रक्ताभिसरण सुधारते. परिणामी केस तुटणे थांबते. त्याचबरोबर मोहरीच्या तेलाचा वापर केल्याने केस मुळापासून मजबूत होतात आणि केस गळतीची समस्या कमी होते.

केसांना पोषण मिळते (Hair is nourished-Mustard Oil Benefits)

मोहरीच्या तेलामध्ये भरपूर पोषक घटक आढळून येतात. यामध्ये प्रोटीन, आयरन, कॅल्शियम, ओमेगा 3 फॅटी ऍसिड, सेलेनियम आणि अँटिऑक्सिडेंट यांचा समावेश आहे. त्यामुळे मोहरीच्या तेलाने केसांना मसाज केल्यावर केसांच्या अनेक समस्या सहज दूर होतात. त्याचबरोबर या तेलाच्या वापराने केसांच्या वाढीस चालना मिळते.

केसांच्या समस्या दूर करण्यासाठी तुम्ही मोहरीच्या तेलाचा वापर करू शकतात. त्याचबरोबर शरीरातील मेटॉलिझम सुधारण्यासाठी तुम्ही खालील पदार्थांचे सेवन करू शकतात.

डाळी आणि शेंगा (Pulses and legumes-For Metabolism)

मेटॉलिझम वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात डाळी आणि शेंगांचा समावेश करू शकतात. याच्या नियमित सेवनाने स्नायू निरोगी राहतात आणि पचनक्रिया देखील मजबूत होते. यामध्ये तुम्ही मूग, हरभरा, शेंगदाणे, मसूर इत्यादी खाद्यपदार्थांचे सेवन करू शकतात.

नारळ आणि खोबरेल तेल (Coconut and coconut oil-For Metabolism)

खोबरेल तेल आणि नारळाच्या सेवनाने शरीरातील मेटॉलिझम सुधारण्यास मदत होते. यामध्ये आढळणारे गुणधर्म शरीरातील मेटॉलिझम नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. त्याचबरोबर खोबरेल तेलाचे सेवन केल्याने वजन नियंत्रण राहू शकते. त्यामुळे नारळ आणि खोबरेल तेल तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

आंबट पदार्थ (Sour food-For Metabolism)

आंबट पदार्थांचे सेवन करणे मेटॉलिझम वाढवण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यासाठी तुम्ही तुमच्या आहारात संत्रा, लिंबू, द्राक्ष इत्यादी पदार्थांचा समावेश करू शकतात. या फळांचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास देखील मदत होते. त्यामुळे मेटॉलिझम वाढवण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात आंबट पदार्थांचे सेवन करू शकतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

Metabolism | शरीरातील मेटॉलिझम सुधारण्यासाठी करा ‘या’ पदार्थांचे सेवन

Vitamin A | शरीरातील विटामिन एची कमतरता पूर्ण करण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

Coconut Oil | केस काळे आणि निरोगी ठेवण्यासाठी खोबरेल तेलासोबत वापरा ‘या’ गोष्टी

Hing Water | हिंगाचे पाणी प्यायल्याने शरीराला मिळतात ‘हे’ अनोखे फायदे

Ashwagandha | त्वचेची नैसर्गिक पद्धतीने काळजी घेण्यासाठी अश्वगंधाचा ‘या’ प्रकारे करा वापर

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.