Eknath Khadse | “…तर मुख्यमंत्री पदासाठी गिरीश महाजन यांना माझा पाठिंबा”; एकनाथ खडसेंचं मोठं वक्तव्य 

Eknath Khadse | जळगाव : राजकीय वातावरण अनेक मुद्द्यांमुळे तापलेलं असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्याविषयी मोठं वक्तव्य केलं आहे.

जळगावच्या राजकारणात एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील वाद सर्वांनाच माहित आहे. अनेक वर्षांपासून या दोन नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. मात्र आज अचानक एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय चर्चा रंगल्या आहेत.

ते म्हणाले, “सुरेश दादा जैन हे मुख्यमंत्री व्हावे यासाठी मी स्वतः बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली होती. मात्र मला जो मुख्यमंत्री पाहिजे आहे, तो कार्यक्षम, दूरदृष्टीचा व सामाजिक हिताचा निकष पूर्ण करणारा मुख्यमंत्री पाहिजे. माझं मत मी त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे व्यक्त केलं होतं.”

“मुख्यमंत्री पदासाठी काही निकष असतात. कार्यक्षम, दूरदृष्टीचा आणि सामाजिक हिताचा निकष पूर्ण करणारा मुख्यमंत्री असेल तर मी गिरीश महाजन यांनाही मुख्यमंत्री पदासाठी पाठिंबा देऊ शकतो”, असं मोठं वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केलंय. आपला परिसर सुजलाम् सुफलाम् व्हावा यासाठी माझा आग्रह आहे. मग कितीही कट्टर दुश्मन असेल तरी मुख्यमंत्री पदासाठी माझा त्यांना पाठिंबा राहील असंही ते म्हणाले.

एकनाथ खडसेंना हायकोर्टाचा दिलासा (High Court’s relief to Eknath Khadse)

दरम्यान, भोसरी भूखंड गैरव्यवहार प्रकरणी उच्च न्यायालयाने एकनाथ खडसे यांना मोठा दिलासा दिला आहे. याप्रकरणी चौकशी करा मात्र या प्रकरणात आता चार्ज शीट किंवा अटक करता येणार नसल्याचा निर्णय उच्च न्यायालयाने देत एकनाथ खडसेंना मोठा दिलासा दिला आहे. या प्रकरणामुळे तत्कालीन मंत्री असलेल्या एकनाथ खडसे यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.याप्रकरणी चौकशी पूर्ण झालेली असताना एकाच विषयाची इतक्या वेळेस चौकशी करून देखील काहीही सापडत नसल्याने भोसरी भूखंड प्रकरणी असलेला एफआयआर रद्द करावा अशी मागणी एकनाथ खडसे यांनी न्यायालयाकडे केली होती. यावर उच्च न्यायालयाने हा निर्णय देत खडसेंना दिलासा दिला आहे.

महत्वाच्या बातम्या :

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.