Chandrashekhar Bawankule | “शिमग्याच्या बोंबा पुरे आता”; उद्धव ठाकरेंच्या सभेवरुन बावनकुळेंची बोचरी टीका

Chandrashekhar Bawankule | मुंबई: राजकारणात काय घडेल काय बिघडेल हे सांगता येत नाही. सत्ताधारी आणि विरोधी पक्षात आरोप-प्रत्यारोपामुळे एकमेकांमध्ये खडाजंगी पहायला मिळते. अशातच आता उध्दव ठाकरेंनी काल (५ मार्च) दिवशी रत्नागिरी येथील खेडमध्ये भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. यावर भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळेंनी ट्वीट केले असून उध्दव ठाकरेंना टार्गेट केलंय.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

खेडमध्ये झालेल्या सभेत म्हणाले की, “मी घरात बसून महाराष्ट्र सांभाळला, पण तुम्ही दिल्लीसमोर मुजरे घालत बसला आहात. तुम्ही माझ्यासोबत होता. माझे कौतुक झाले नाही तर महाराष्ट्राचे कौतुक झाले आहे. आपले जागतिक कौतुक झाले. गुजरातच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातील उद्योग पळवले आहेत. तुटलेल्या एसटीवर गतिमान महाराष्ट्राची जाहिरात करतात. यांना कसली शरम नाही.” असे ठाकरे म्हणाले.

“२०२४ नंतर देशात लोकशाही शिल्लक राहणार नाही”

“मी शून्य आहे मला बाळासाहेबांमुळे किंमत आहे. पण गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल, बंगालमध्ये सुभाषचंद्र बोस आणि इकडे बाळासाहेब चोरले. या चोरवृत्तीला मतदान करणार का? २०२४ साली स्वातंत्र्य लढ्याशी संबंध नसलेला पक्ष आहे. हा निश्चय करा त्यानंतर २०२४ ला लोकशाही शिल्लक राहणार नाही” असे ठाकरे म्हणाले. आता यावरच भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्वीट करत ठाकरेंवर पलटवार केला आहे.

Chandrashekhar Bawankule Comment  On Uddhav Thackeray 

“भाजपाच्या व्यासपीठावर आधी साधू असायचे, आता संधीसाधू – उद्धव ठाकरे. पालघरची घटना इतक्यात विसरलात ? उद्धवजी, तुम्ही मुख्यमंत्री असताना निष्पाप साधूंच्या हत्या झाल्या. मारेकऱ्यांना तुम्ही पोटाशी धरले. रक्ताचे पाट तुमच्याच कारकिर्दीत वाहिले. शिमग्याच्या बोंबा पुरे आता..” असे ट्वीट करत चंद्रशेखर बावनकुळेंनी उध्दव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

महत्वाच्या बातम्या-

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.