अजित पवार गटातील मोठा नेता नाराज; घरवापसीचे दिले संकेत

Big leader in Ajit Pawar group upset; The leader will come to Sharad Pawar

Ajit Pawar Vs Sharad Pawar | राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार एकमेकांविरोधात उभे राहिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसवर अजित पवारांनी दावा केल्या नंतर निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीचे नाव आणि चिन्ह अजित पवारांना दिले आहे.

निवडणूक आयोगाने लोकप्रतिनिधींच्या संख्याबळाच्या आधारावर अजित पवार यांच्या गटाला पक्षाचं नाव आणि चिन्ह दिलं. तसेच अजित पवार यांचा गट हाच मुख्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, अशी मान्यता निवडणूक आयोगाने दिली. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाच्या विरोधात शरद पवार गट सुप्रीम कोर्टात गेला होता.

सुप्रीम कोर्टाने अजित पवार ( Ajit Pawar Group ) गटाला शरद पवारांचे नाव आणि फोटो वापरण्यास मनाई केली आहे, तसेच घड्याळ चिन्ह अजित पवारांकडे राहील पण खटल्याच्या अंतिम निकालात या निर्णयात बदल होऊ शकतो. त्यामुळे भविष्यात घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांच्याकडेच राहील, याबाबत शाश्वती नसल्याचे संकेत सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

अजित पवार यांना घड्याळ हे चिन्ह हे त्यांच्याकडे असल्याचे पब्लिक नोटीस मधून सांगावे लागणार आहे. तसेच निवडणुकीत अजित पवार गटाला घड्याळ चिन्ह वापरताना त्याखाली न्यायप्रविष्ट असल्याचा उल्लेख सर्वांना दिसेल अशा ठळक अक्षरात लिहावे, असेही कोर्टाने अजित पवार गटाला निर्देश दिले आहेत.

दरम्यान, या सगळ्या गोष्टी घडत असतांना अजित पवार गटाची धाकधूक वाढली आहे. पक्ष आणि चिन्ह धोक्यात असल्याची चर्चा आपसांत चालू झाली आहे. शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्या शिवाय राष्ट्रवादीचे भविष्य अंधारात आहे, अशी हि धुसफूस आता पक्षांतर्गत चालू झाली आहे.

नाव न छापण्याच्या अटींवरून अजित पवार गटाच्या नेत्याने अनेक मोठे गौप्यस्फोट केले आहेत. लोकसभेनंतर गटातील अनेक नेते शरद पवारांकडे घरवापसी करतील किंवा भाजप मध्ये जातील असे सांगितले आहे. आमदार निलेश लंके यांनी बांध फोडत घरवापसी केली आहे. त्यानंतर धनंजय मुंडे यांचे निष्ठावान कार्यकर्ते बजरंग सोनवणे यांनी शरद पवार गटात पक्ष प्रवेश केला आहे.

राष्ट्रवादीचे राजकारण आणि जुन्या नव्या घटनांचा आढवा 

ते मोठे नेते कोण ? 

धनंजय  मुंडे (Dhananjay Munde) यांनी कृषिमंत्री पदाचा राजीनामा दिल्याचा रोहित पवारांनी दावा केला होता. कृषी मंत्री टीव्ही वर, बैठकीला दिसत नसल्याचे पवारांनी सांगितले होते. यावर छगन भुजबळांनी मिस्कील टिपण्णी करत म्हणाले, ” ते मला माहित नाही, पण मी मात्र OBC च्या प्रश्नांवर भूमिका मांडण्यासाठी राजीनामा दिला होता, असे भुजबळांनी सांगितले.

महायुतीत गेल्यावर धनंजय  मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्याशी बहीण-भावाचे नाते सुधारले आहे. तसेच पंकजा मुंढे यांना लोकसभेची उमेदवारी देत आपला राजकीय विरोधक संपवला आहे. परंतु, धनंजय मुंडे यांच्या अडचणी कमी होतांना दिसत नाही आहेत. धनंजय मुंडे यांचे निष्ठावान कार्यकर्ते बजरंग सोनवणे आणि बबन गित्ते यांनी मुंडे यांची साथ सोडत त्यांना मोठा धक्का दिला आहे.

शरद पवार यांची बीडमध्ये ताकद आहेच. मात्र, आता नुसती ताकद दाखवायची नाही तर विरोधकांना धोबीपछाड करून आपला उमेदवार विजयी झालाच पाहिजे, या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. धनंजय मुंडे यांच्या गोटातील एक-एक माणूस आपल्याकडे आणून लोकसभेतील उमेदवाराच्या मागे मोठी फौज उभी करू पाहत आहेत.

सध्या तरी शरद पवारांचे मिशन बीड सुरू आहे, असेच चित्र पाहायला मिळत आहे. धनंजय मुंडे यांचे विश्वसु बबन गीते नंतर आता बजरंग सोनवणे यांना पवारांनी आपल्या पार्टीत आणले आहेत. परळीत धनंजय मुंडे यांना निवडून आणण्यासाठी महत्वाची भूमिका बजावणारा एक नेता पवारांनी आपल्या गळाला लावला असून आष्टी येथील वजनदार माजी आमदारांनी देखील पवारांची भेट घेतली असल्याची कालपासून बीडमध्ये चर्चा आहे.

छगन भुजबळ विरुद्ध अजित पवार शीतयुद्ध

राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन झाल्यानंतर छगन भुजबळ (Chhagan Bhujbal ) हे राज्यातले दुसऱ्या क्रमांकाचे नेते होते. पण कालांतरानं त्यांची जागा अजित पवार यांनी घेतली. हा नेतृत्व बदल होण्याच्या काळातच दोन्ही नेत्यांमध्ये दुरावा येत गेलं असं राजकीय जाणकार सांगतात. भुजबळ पहिले प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री झाले. पण त्यानंतर शरद पवार जेव्हा खासदार म्हणून दिल्लीला गेले, त्यावेळेपासून अजित पवार यांचं पक्षातलं स्थान वाढलं.

2004 ला भुजबळ यांना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पद दिले तेव्हापासूनच अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यात संघर्ष सुरू झाला असल्याचे बोलले जाते. अजित पवारांनी बाळासाहेबांच्या अटकेच्या प्रकरणाचा विषय काढल्यावर छगन भुजबळ आणि अजित पवारांचा वाद समोर आला होता.

अजित पवार यांच्यावर सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले. त्यांच्यावर एवढे आरोप होऊनही त्यांना काही झालं नाही, पण भुजबळांवर कुठलंही दोषारोपपत्र नसतांना त्यांना मात्र तुरुंगवास भोगावा लागला. हे भुजबळांच्या मनात कुठेना कुठे तरी हे खुपत आहे की अजित पवारांना वाचवण्यासाठी शरद पवारांनी त्यांना तुरुंगात पाठवलं, असे बोलले जाते.

२०१९ च्या काळात भुजबळ शिवसेनेच्या दारापर्यंत जाऊन आले, पण शिवसेनेतूनच त्यांच्या घरवापसीला विरोध झाला. भुजबळ मनाने राष्ट्रवादीत आहेत, असं म्हणण्याची स्थिती नाही. ते नाराज आहेत आणि त्यांच्यासमोर पर्याय नाहीत.

छगन भुजबळ विरुद्ध अजित पवार जातीय राजकारणामुळे वाद?

छगन भुजबळ आणि अजित पवार सध्या जरी एकत्र दिसत असले तरी त्याला जातीय राजकारणाची देखील किनार आहे. भुजबळांनी अनेकदा पत्रकारांशी अनौपचाकीक गप्पा मारताना मराठा नेते बहुजन नेतृत्व सहजासहजी स्वीकारत नाहीत. मराठा समाजातल्या प्रस्थापित नेत्यांच्या मनात अहम भाव असतो, असे भुजबळ यांनी अनौपचारीक गप्पा मारताना म्हंटले होते.

छगन भुजबळ हे अजित पवार यांच्या सोबत जास्त दिवस राहणार नाहीत तसे संकेत हि गेल्या काही दिवसात आले आहे. मनोज जरांगे यांच्यावर कोणीही टीका-टिपण्णी करू नये असा आदेश अजित पवारांनी देऊनही भुजबळ कायम बोलत राहिले, OBC मेळाव्यातून जरांगे यांच्यावर टीका करत राहिले . पवारांच्या आदेशाला भुजबळांनी केराची टोपली दाखवली होती.

सुनील तटकरे यांच्यासाठी धोक्याची घंटा

आगामी निवडणूक सुनील तटकरे (Sunil Tatkare ) यांच्यासाठी सोपी नसणार आहे, कारण शेकापची सुनील तटकरे यांना साथ मिळणार नाही. तसेच  धैर्यशील पाटील गटाच्या नाराजीचा फटका तटकरे यांना बसणार आहे. याशिवाय आदिती तटकरे यांच्यामुळे भरत गोगावले यांचे मंत्रिपद आणि पालकमंत्रीपद हुकल्याने शिवसेनेचे आमदार भरत गोगावले हेही तटकरे कुटुंबावर नाराज आहेत.

तटकरे यांच्यावर घराणेशाहीचा आरोप विरोधांकडून केला जातो. तटकरे खासदार, मुलगी आदिती तटकरे मंत्री, पुतण्या आमदार म्हणत विरोधक टीका करत आहेत.

अजित पवार यांचे शर्थीचे प्रयत्न

सुनेत्रा पवारांना बारामती लोकसभा मतदार संघातून निवडून आणण्यासाठी अजित पवार यांचे शर्थीचे प्रयत्न करताना दिसत आहे. बहिणीच्या विरोधात अजित पवारांनी ( Ajit Pawar ) रान उठवले आहे.

२०१४ लोकसभा निवडणुकीवेळी सुप्रिया सुळे यांना मतदान करा, अन्यथा गावचे पाणीच तोडू असा प्रवास आता कंपनीतून कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यापर्यन्त येऊन पोहचला आहे.

त्यावेळी फडणवीस म्हणाले होते,”ही दादागिरी नव्हे तर गुन्हा आहे. भारतात ठोकशाही नव्हे लोकशाही आहे हे अजित पवारांनी लक्षात ठेवायला हवे. अशा लोकांना जनता धडा शिकवेल, असे फडणवीस म्हणाले होते.  मात्र, माझा आवाज काढून बदनामीचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा अजित पवारांनी केला होता.

२०१४ ला काय म्हणाले होते अजित पवार?

बारामती आमच्यासोबत आहे. एकट्या मासाळवाडीने मत दिले नाही तरीही माझी बहीण काही हरणार नाही. या गावातील एखाद्याने गडबड करण्याचा प्रयत्न केला तर मी पाणीपुरवठा तोडून टाकीन. ईव्हीएममधून मला कळेलच की कुणी मत दिलेले नाही. मासाळवाडीने आमच्याविरोधात मतदान केले, हे मला कळले तर लक्षात ठेवा, तुम्हाला कधीही पाणी मिळणार नाही.

Big leader in Ajit Pawar group upset; The leader will come to Sharad Pawar

लोकसभे निवडणुकीनंतर अजित पवार गटातील अनेक दिग्ग्ज नेते हे अजित पवारांची साथ सोडतील. आमदार निलेश लंके यांनी बांध फोडत घरवापसी केली आहे. त्यानंतर धनंजय मुंडे यांचे निष्ठावान कार्यकर्ते बजरंग सोनवणे आणि बबन गित्ते यांनी शरद पवार गटात पक्ष प्रवेश केला आहे.

वरील घटनांचा अभ्यास केला तर अजित पवार गटात सर्व ठीक चालेल असे दिसत नाही. भविष्यात अनेक दिग्गज नेते अजित पवारांना सोडून शरद पवार गट किंवा भाजप मध्ये जातील.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.