Maratha Reservation | 24 डिसेंबर की 2 जानेवारी? बच्चू कडू म्हणतात…

बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

Maratha Reservation | टीम महाराष्ट्र देशा: मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आमरण उपोषण सुरू केलं होतं.

काल (02 नोव्हेंबर) त्यांच्या उपोषणाचा नववा दिवस होता. काल उपोषण स्थळी मनोज जरांगे यांना उपोषण मागे घेण्याची विनंती करण्यासाठी राज्य सरकारचं शिष्टमंडळ दाखल झालं होतं.

त्यांनी केलेल्या विनंतीवरून मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण मागे घेतलं आहे. त्याचबरोबर राज्य शासनाच्या शिष्टमंडळाने मराठा आरक्षणावर ठोस निर्णय घेण्यासाठी जरांगे यांना 2 जानेवारीपर्यंत मुदत मागितली होती.

परंतु, मनोज जरांगे यांनी सरकारला 24 डिसेंबर पर्यंत वेळ दिला आहे. अशात या मुदतीबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Bacchu Kadu commented on Maratha Reservation

प्रसार माध्यमांशी बातचीत करत असताना बच्चू कडू म्हणाले, “काल मनोज जरांगे यांच्यासोबत आमची 10 ते 15 मुद्द्यांवर चर्चा झाली. गेल्या अनेक वर्षापासून सगळ्याच पक्षांनी मराठा समाजावर मोठा अन्याय केला आहे.

त्यामुळे आता मराठा समाज आक्रमक झालेला असून कोणत्याच पक्षावर त्यांचा विश्वास नाही. मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला 24 तारीख दिली आहे. त्यानुसार सरकार काम करेल.

सरकारला यासाठी आता 24 तास काम करावं लागणार आहे. या मुद्द्यावर (Maratha Reservation) तोडगा काढण्यासाठी साधारण तीन महिने लागतील, असं मी जरांगे यांना सांगत होतो.

मात्र जानेवारीत लोकसभेची आचारसंहिता लागण्याआधी या मुद्द्यावर (Maratha Reservation) तोडगा निघाला पाहिजे, असं माझ्या लक्षात आलं आहे. त्याआधी जर मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तर मराठ्यांचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही.”

Uday Samant commented on Maratha Reservation

दरम्यान, या मुद्द्यावर मंत्री उदय सामंत यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “मनोज जरांगे संवेदनशील आहे. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी काल आपलं उपोषण मागे घेतलं.

मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावर निर्णय घेण्यासाठी आपल्याला सरकारला वेळ द्यावा लागेल, अशी भूमिका त्यांनी मांडली.

यानंतर डेडलाईनबद्दल चर्चा सुरू झालेली असून 24 डिसेंबर आणि 2 जानेवारी या तारखा समोर आल्या आहे. अशात मनोज जरांगे ज्या पद्धतीने सांगतील, त्याच पद्धतीने राज्य शासन यावर काम करणार आहे.”

महत्वाच्या बातम्या

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe