Cow Hug Day | …म्हणून केंद्र सरकारने ‘काऊ हग डे’ वरून दिलेला निर्णय घेतला मागे

Cow Hug Day | नवी दिल्ली : केंद्र, सरकारच्या पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय मंत्रालयाने ‘14 फेब्रुवारी रोजी ‘व्हेलेंटाईन डे’च्या (Valentine Day) दिवशी गाईला मिठी मारून Cow Hug Day साजरा करावा’ असा आदेश केंद्र सरकारने दिला होता. तसे निर्देश देणारे एक परिपत्रकही काढण्यात आले होते. केंद्र सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात सोशल मीडियावर केंद्र सरकारवर टीकेचे झोड उठवली होती. त्यानंतर आज सरकारकडून पत्रक काढत आदेश मागे घेतला गेला आहे.

केंद्र सरकारच्या या निर्णयावर देशभरातून टीका करण्यात आली. याच कारणामुळे केंद्र सरकारने याबाबतचा निर्णय मागे घेतला आहे. केंद्रीय वन्यजीव संरक्षण महामंडळाने तसे निर्देश दिले आहेत. भारतीय पशू कल्याण मंडळाने 14 फेब्रुवारी रोजी गाईला मिठी मारण्याचा आदेश पशूसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाच्या आदेशानुसार मागे घेण्यात आला. यावरुन समाज माध्यमांवर याबाबत खिल्ली उडवली जात होती.

विरोधकांकडून टीकेची झोड

सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस (Social Media Memes)

अॅनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडियाच्यावतीने 14 फेब्रुवारी रोजी ‘व्हेलेंटाइन डे’ ऐवजी ‘Cow Hug Day’ साजरा करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर लोकांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली. हा निर्णय हास्यास्पद असल्याचे अनेकांनी म्हटले. ‘गाईला मिठी मारण्यासाठी 14 फेब्रुवारीच का, इतर दिवस का नाही?’ असा प्रश्नही सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी उपस्थित केला होता.

केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर सोशल मीडियावर मीम्सची लाट उसळली. गाईला मिठी मारल्याने भावनात्मक समृद्धी येईल असा तर्क लावण्यात आला होता. सर्व गाईप्रेमींनी 14 फेब्रुवारी हा दिवस गाईचे महत्त्व लक्षात घेऊन आणि जीवन आनंदी आणि सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण बनवून गायींना मिठी मारून हा दिवस साजरा करावा,” असे पशू कल्याण मंडळाने आपल्या आदेशात म्हटलं होतं.

महत्वाच्या बातम्या-

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.