Pune NCP : राष्ट्रवादीच्या कार्यालयावर अजित पवार गटाच्या दाव्यानंतर पोलिसांचा मोठा बंदोबस्त

Ajit Pawar VS Sharad Pawar Pune NCP

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Pune NCP – निवडणूक आयोगाकडून (Election Commission Of India) राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला देण्यात आल्यानंतर आता कार्यालये ताब्यात घेण्याची स्पर्धा सुरु झाली आहे.

वरिष्ठ पातळीवरून आदेश आले की, लगेच राष्ट्रवादी पक्ष कार्यालये ताब्यात घेऊ, असे व्यक्तव्य अजित पवार गटाकडून अमोल मिटकरी यांनी केले आहे.

तर पुण्यात शरद पवार (sharad Pawar) गटाचे प्रशांत जगताप यांनी पुण्यातील कार्यालयावरील घड्याळ चिन्ह हटवलं आहे. यावेळी कार्यालयावरील चिन्ह काढताना जगताप आणि कार्यकर्त्यांना अश्रु अनावर झाले होते.

Ajit Pawar VS Sharad Pawar Pune NCP

मात्र आता पुण्यातील राष्ट्रवादी कार्यालयावर अजित पवार गट दावा करण्याची शक्यता आहे. तश्या हालचालींना आता वेग आल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे अजित पवार गट आणि शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या कार्यालयात अजित पवारांच्या नावाची पाटीची तोडफोड करण्यात आल्याचा आरोप अजित पवार गटाकडून करण्यात आला आहे. त्यानंतर काही काळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर तणाव निर्माण झाला होता.

राष्ट्रवादीच्या कार्यालया बाहेर पुणे पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दोन्ही गटात शांताता राहावी यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्न करत आहे.

महत्वाच्या बातम्या