Maratha Reservation | अजित पवार मराठा आरक्षण विरोधात कोर्टात जाणार; ‘या’ मोठ्या नेत्याचा गौप्यस्फोट

Ajit Pawar will go to court against Maratha reservation

Maratha Reservation  | मुंबई, दि. २ फेब्रुवारी | मराठ्यांना OBC प्रवर्गातून आरक्षण देण्याविरोधात अनेक मराठा तसेच OBC नेते एकवटले आहेत. अश्यातच नाना पटोले यांनी मराठा आरक्षणा संदर्भात मोठा गौप्यस्फोट केला आहे.

तसेच, सत्ताधारी मराठा आमदार संजय गायकवाड यांनी OBC नेते छगन भुजबळ यांना शिविगाळ केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती, या प्रकरणी नाना पटोले निषेध नोंदवला आहे.

पटोले निषेध नोंदवत म्हणाले की, भुजबळ हे मागासवर्गीय समाजाचे आहेत म्हणूनच त्यांच्याबद्दल अत्यंत खालच्या पातळीवरची शिविगाळ करणारी भाषा वापरण्यात आली आहे, ही मानसिकता भारतीय जनता पक्षाची आहे..

भुजबळांबद्दल जी भाषा वापरली त्याबद्दल सरकारने माफी मागावी आणि हिम्मत असेल तर सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाडांना तातडीने निलंबित करावे, अशी मागणी नाना पटोले ( Nana Patole ) यांनी केली आहे.

Ajit Pawar will go to court against Maratha reservation

पुढे बोलतांना नाना पटोले म्हणाले की, सरकार राज्यात जाणीवपूर्वक ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद निर्माण करत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांचाच मराठा अध्यादेशाला विरोध असून ते कोर्टात जाण्याची भाषा करत आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात हा काय तमाशा चालवला आहे? भाजपाने महाराष्ट्राचे मोठे नुकसान केले आहे यातून महाराष्ट्राला वाचवण्यासाठी आमची लढाई सुरु आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.