Shehzada Trailer | बॉलीवूडने पुन्हा खाल्ली माती; अल्लु अर्जुनच्या सुपरहिट सिनेमाचा केला कचरा

Shehzada Trailer | टीम महाराष्ट्र देशा: अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aryan) गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. यावेळी त्याचा आगामी चित्रपट ‘शेहजादा’ (Shehzada) चर्चेचे कारण बनला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चाहते या चित्रपटाच्या ट्रेलरची वाट बघत होते. चाहत्यांची ही प्रतीक्षा संपलेली असून या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर पाहताच नेटकऱ्यांनी त्यावर टीका करायला सुरुवात केली आहे. बॉलिवूडने पुन्हा एकदा अल्लु अर्जुनच्या सुपरहिट चित्रपटाचा कचरा केला आहे, असं देखील नेटकऱ्यांकडून म्हटलं जात आहे.

‘शेहजादा’ या चित्रपटामध्ये कार्तिक आर्यन आणि कृती सेनन एकत्र दिसणार आहे. या आधी हे दोघे ‘लुका चुपी’ या चित्रपटामध्ये मोठ्या पडद्यावर एकत्र झळकले होते. या चित्रपटामध्ये हे दोघे रोमान्स करताना दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झालेला असून नेटकऱ्यांकडून त्यावर टीका होत आहे. बॉलीवूडने पुन्हा एकदा माती खात अल्लु अर्जुनच्या सुपरहिट सिनेमाचा कचरा केला असल्याचं नेटकरी म्हणाले आहे.

‘शेहजादा’ (Shehzada) च्या ट्रेलरवर नेटकरांच्या कमेंट्स

@jeevan rai

No one can replace अल्लू अर्जुन,he is only one masterpieace 💫✨

@kundan sing nigdali

अल्लू अर्जुन No One Can Replace Him 🔥🔥 अल्लू अर्जुन की ऐक्टिंग 🔥 कोई नहीं उनके स्वॉग को कापी कर ही नहीं सकता 🔥❤

@k vyankatesh

Real movie lover’s requested to go and watch Ala vaikuntpuramalo trailer 💥💥 just as a audience…no comparison those who don’t know why we AA Army fan’s told “no one can replace/beat AA acting” u all know what’s the range of Bunny Anna acting….My Bunny anna always Thaggedele 😎💥💥💥

‘शेहजादा’ या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित धवन यांनी केले आहे. हा चित्रपट अल्लु अर्जुनच्या अला वैकुंठपुरमलो (Ala Vaikunthapurramuloo) या चित्रपटाचा बॉलीवूड रिमेक आहे. ‘शेहजादा’चा ट्रेलर बघितल्यानंतर नेटकरी संतापले आहे. कारण या चित्रपटामध्ये अल्लू अर्जुनची तुलना कार्तिक आर्यनसोबत करण्यात आली आहे. चाहत्यांना ही तुलना अजिबात आवडलेली नाही.

एका यूट्यूब चॅनलने या चित्रपटाचा रिव्ह्यू व्हिडिओ बनवला आहे. त्या व्हिडिओ वरील काही कमेंट्स वाचा –

@sk

None replace Allu Arjun’s swag 😎😎

@shahajan shaikh

No one can beat Allu Arjun Sir in acting 🥰💕

@officialridhiraj8600

No Can Replace Allu Arjun’s Swag 😎 No One Can Replace Allu Arjun’s Dance 🤟 No One Can Replace Allu Arjun’s STYLE Allu Arjun BRAND He BRAND 🔥🔥

@pushpendrasinghrathore3989

No one can match the stardom and performance of the legend allu arjun 🙏

@bantaishubhu5135

Allu arjun को मैच करना इंडियन सिनेमा में कोई भी नहीं कर सकता 🔥 he is a Rockstar Superstar stylish star, ये बंदा पूरा का पूरा ही powerhouse है 🔥👑✌

@Om_tripathi

Allu Arjun ️ stylish star ✨✨

दरम्यान, बॉलीवूड नेहमी सुपर हिट चित्रपटाचा कचरा करते, अशी टीका देखील नेटक्यांकडून केली जात आहे. बॉलीवूडने अनेक दक्षिणात्य चित्रपटांचे रिमेक बनवले आहे आणि ते रिमेक फ्लॉप ठरले आहेत. त्याचबरोबर बॉलीवूडने सुपरहिट मराठी चित्रपट ‘मुळशी पॅटर्न’चा देखील रिमेक बनवला होता. बॉलीवूडचा हा रिमेक देखील सुपर फ्लॉप ठरला होता.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.