Manisha Kayande | ठाकरे गटाच्या दबावाला आम्ही बळी पडणार नाही – मनीषा कायंदे

Manisha Kayande | मुंबई: आजपासून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ठाकरे गटानं तीन आमदारांना मोठा धक्का दिला आहे. शिवसेना शिंदे गटाच्या तीन आमदारांना अपात्र करण्याची मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.

We will not succumb to pressure – Manisha Kayande

नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe), मनीषा कायंदे (Manisha Kayande) आणि गोपीकिशन बजोरिया (Gopikishan Bajoria) यांना अपात्र करा, अशी मागणी ठाकरे गटांनी विधिमंडळ सचिवांकडे पत्राद्वारे केली आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार मनीषा कायंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, “मला आणि नीलम गोऱ्हे यांना मुद्दाम टार्गेट केलं जात आहे.

विधान भवनात जो काही तमाशा झाला आहे त्यावरूनच आमच्यावर लक्ष साधलं गेलं आहे. सूड घेण्याच्या भावनेतूनच ठाकरे गटनं सर्व केलं आहे. मात्र , आम्ही दबावाला बळी पडणार नाही. आम्ही त्यांना योग्य उत्तर देऊ.”

पुढे बोलताना त्या (Manisha Kayande) म्हणाल्या, “अद्याप माझ्यापर्यंत कोणत्याही प्रकारची नोटीस आलेली नाही. मात्र जेव्हा मला नोटीस मिळेल त्यावेळी मी त्यांना योग्य ते उत्तर देईल.

आम्ही जेव्हा उद्धव ठाकरेंसोबत होतो त्यावेळी आमच्यावर अन्याय झाला. तेव्हा त्यांनी आमच्याकडे दुर्लक्ष केलं. याची मला खूप जास्त खंत वाटते.”

“सत्ताधारी पक्ष म्हणून आम्ही विधानसभेमध्ये जनतेचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे संजय राऊत काय म्हणतात याकडे आम्ही दुर्लक्ष करतो.

आम्ही सांगितलेल्या समस्यांवर तोडगा निघेल. लोकांचे प्रश्न सोडवले जातील असा आमचा ठाम विश्वास आहे”, असही त्या (Manisha Kayande)यावेळी म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.