UPSC Recruitment | सरकारी नोकरीची संधी! UPSC यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

UPSC Recruitment | टीम कृषीनामा: यूपीएससी (UPSC) ची तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग (Union Public Service Commission) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.  या भरती प्रक्रियेसाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे.

यूपीएससी यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये 10 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये विपणन विशेषज्ञ / अर्थशास्त्रज्ञ, आर्किव्हिस्ट आणि प्रशासकीय अधिकारी पदांच्या रिक्त जागा आहेत. या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवार 16 फेब्रुवारी 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील.

सरकारी नोकरी | केंद्रीय लोकसेवा आयोग (Union Public Service Commission)

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये पदानुसार वेगवेगळी शैक्षणिक पात्रता ठरवण्यात आली आहे. शैक्षणिक पात्रतेबद्दल सविस्तर माहिती मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवार http://upsc.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

केंद्र सरकारच्या या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवार 16 फेब्रुवारी 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील. या भरती प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार http://upsc.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

महत्वाच्या बातम्या