Raj Thackeray | “उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना जो त्रास दिला…”; मनसे नेत्याचं खळबळजनक वक्तव्य

Raj Thackeray | चिपळूण: मनसे अध्यक्ष राज ठाकरे पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी सध्या ॲक्शन मोडवर आल्याचं दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे आजपासून कोकण दौऱ्यावर आहे. आज ते दापोली येथे मनसे कार्यालयाचं उद्घाटन करणार आहे. राज ठाकरे चिपळूणमध्ये दाखल होण्यापूर्वी मनसे नेते अविनाश जाधव ( Avinash Jadhav) यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलत असताना त्यांनी एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे.

माध्यमांशी संवाद साधत असताना अविनाश जाधव म्हणाले, “कोकण दौऱ्यामध्ये राज ठाकरे (Raj Thackeray) मनसेतील सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील. जिल्ह्याचा विकास कसा होईल? जिल्ह्यात कशा प्रकारची काम केली पाहिजे? याबद्दल राज ठाकरे आम्हाला सांगतील.

त्याचबरोबर पक्षाला आमच्याकडून काय अपेक्षा आहेत, यावर देखील ते भाष्य करतील. त्यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार आम्ही कोकणामध्ये काम करणार आहोत.”

Matoshree has given us a lot of trouble – Avinash Jadhav

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) एकत्र येणार का? या प्रश्नाचे उत्तर देत अविनाश जाधव म्हणाले, “मातोश्रींनी आम्हाला खूप त्रास दिला आहे. त्याचबरोबर त्यांनी राज ठाकरेंना देखील खूप सतावलं आहे. या गोष्टी आम्ही कधीच विसरू शकत नाही.

मात्र राज ठाकरेंनी जर निर्णय घेतला, तर आम्ही तो मान्य करू. त्यांनी जर ठाकरे गटासोबत जायचं ठरवलं तर आम्ही त्यांच्यासोबत आहोत. त्याचबरोबर आम्ही प्रत्येक परिस्थितीत राज ठाकरेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.”

दरम्यान, अविनाश जाधव यांच्या या वक्तव्यानंतर मनसे आणि शिवसेना ठाकरे गटात मोठा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचबरोबर त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळाच्या उधाण आलं आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? अशा चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्या आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.