Sanjay Shirsat | मंत्रिमंडळ विस्ताराबाबत संजय शिरसाटांचा मोठा दावा, म्हणाले…

Sanjay Shirsat | छत्रपती संभाजीनगर: सध्या मंत्रिमंडळ विस्तारावरून राज्याचं राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या नेत्यांकडून याबाबत दावे केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. मंत्रिमंडळ विस्तार आज किंवा उद्या होईल, असा दावा संजय शिरसाट यांनी केला आहे.

The state cabinet will be expanded today or tomorrow – Sanjay Shirsat

राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटप आज किंवा उद्या होईल असं वक्तव्य शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी केलं आहे. मात्र, मंत्रिमंडळ विस्तारामध्ये संजय शिरसाट यांची वर्णी लागणार की नाही? याबाबत अद्यापही शंका आहे.

अजित पवार गट सरकारमध्ये सामील झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार लवकर होणार नसल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. अशात मंत्रिमंडळ विस्तार पावसाळी अधिवेशनानंतर होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

परंतु, आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी केलेल्या दाव्यानुसार आज किंवा उद्या मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो. संजय शिरसाट यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे गटातील चार आमदारांना मंत्रिपद दिलं जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यामध्ये संजय शिरसाट (Sanjay Shirsat) आणि संजय रायमुलकर या दोघांपैकी एकाला मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे.

त्यामुळं संजय शिरसाट यांना मंत्रिपद मिळणार का? हा प्रश्न कायम आहे. तर भरत गोगावले, योगेश कदम आणि अनिल बाबर यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.