शाळेच्या सहलीत भीगे होंठ तेरे…; मुख्याध्यापिकेचे विद्यार्थ्यासोबत जंगलात अश्लील चाळे

मुख्याध्यापिकेनं विद्यार्थ्यासोबत अश्लील चाळे केल्याचा प्रकार; दोघांचे फोटो व्हायरल झाल्यानं हा प्रकार उघडकीस

Teacher student kissing in school picnic
  • Karnataka Obscene Photo Shoot Of Principal Student Goes Viral
  • Teacher student romance and kissing school picnic photos and videos leaked online
महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Teacher Student Romance And Kissing | सरकारी शाळेच्या मुख्याध्यापिका आणि विद्यार्थ्याचा चुंबन घेत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. शाळेच्या सहलीत मुख्याध्यापिका आणि विद्यार्थी चुंबन घेत, अश्लील चाळे करत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे.

हि घटना कर्नाटकच्या चिक्काबल्लापूर जिल्ह्यातील चिंतामणी तालुक्यातील मुरुगामल्ला गावातील आहे. फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शिक्षण विभागामध्ये मोठी खळबळ उडाली होती.

पुष्पलथा असे या मुख्याध्यापिकेचे नाव आहे. तिने शाळेच्या सहलीत SSLC मध्ये शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थ्याचं चुंबन घेतल्याचा आणि त्याच्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप पालकांकडून करण्यात आला आहे.

व्हिडीओ आणि फोटोंमध्ये मुख्याध्यापिका हायस्कूलच्या विद्यार्थ्यासह रोमँटिक पोझमध्ये दिसत आहे. फोटोमध्ये विद्यार्थी शिक्षिकेचे चुंबन घेताना, तिला मिठी मारताना आणि तिच्या साडीचा पदर ओढताना दिसत आहे.

व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये विद्यार्थी सुद्धा मुख्याध्यापिकेला आनंदाने मिठी मारताना, पोज देताना दिसत आहे यावरून  मुलावर जबरदस्ती झाली नसावी असा अंदाज लावण्यात येत आहेत. या प्रकरणी शिक्षण विभागानं मुख्याध्यापिकेविरोधात निलंबनाची कारवाई केली आहे.

शाळेतील एका विद्यार्थ्यानं मुख्याध्यापिकेचे फोटो आणि व्हिडीओ चित्रित केले. दोन विद्यार्थी आणि मुख्याध्यापिका वगळता अन्य कोणालाच या फोटोंबद्दल माहिती नव्हती.  मुख्याध्यापिकेनं शाळेच्या सहलीत काढलेले फोटो आणि व्हिडीओ डिलीट केले असले तरी फोटो आणि व्हिडीओ रिस्टोर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

हा प्रकार उघडीस आल्यानंतर आई, वडील आणि नातेवाईकांनी शाळेला भेट देत मुख्याध्यापिका पुष्पलथा यांना जाब विचारला आहे. आणि मुख्याध्यापिके विरोधात गटशिक्षण अधिकारी (बीईओ) यांच्याकडे तक्रार केली आहे. तक्रारीची दखल घेत चिक्काबल्लापूरचे शिक्षण उपसंचालकांची या प्रकरणात सखोल तपासाचे आदेश दिले आहे.

शाळेची सहल २२ ते २५ डिसेंबर दरम्यान होरानाडू, याना आणि अन्य ठिकाणी गेली होती. त्या दरम्यान चुंबनाचे व्हिडीओ आणि फोटो घेतले होते. व्हिडीओ आणि फोटों व्हायरल झाल्यानंतर शिक्षण विभागानं मुख्याध्यापिकेविरोधात निलंबनाची कारवाई केली आहे आणि शिक्षण उपसंचालकांची या प्रकरणात सखोल तपासाचे आदेश दिले आहे.

महत्वाच्या बातम्या